konkandhara.com

  • Home
  • लेख
  • हे पुरुषा, बरं झालं तुला मोठे स्तन नाहीत!
Image

हे पुरुषा, बरं झालं तुला मोठे स्तन नाहीत!

लेखीका : लक्ष्मी यादव

समाजातील स्त्री-पुरुषांवरील दुहेरी निकष, शरीरावरून होणारी थट्टा आणि महिलांना सहन करावा लागणारा मानसिक त्रास यावर आधारित हा लेख तुम्हाला नवा दृष्टिकोन देईल.

तुला असतेच जर मोठे स्तन
तर तुलाही तुझ्या कपड्यांवरून दिसणाऱ्या
स्तनांच्या आकाराची चर्चा करणाऱ्या
तुझ्याच देशबांधवांची शरम वाटली असती
तुझ्या कपड्यातून त्यांनी तुझं शरीर
आरपार नग्न करून पाहिलं
हे ऐकून तुझ्या अंगावर घृणेचे शहारे उमटले असते

तू असतास स्त्री तर
तुझ्या स्तनांच्या अब्रूचं मोल
तू कोण आहेस यावरून ठरवलं गेलं असतं
वेश्येचे स्तन दिसले तरच किंमत
मुस्लीमचे दिसले तर हराम आहे
मातंग बाईचे तर आधीच बदनाम आहे
नाचणारणीचे टंच हवेत
बायकोचे इतर पुरुषाला दिसू नयेत
मंत्र्यांसंत्र्याच्या पत्नीचे स्तन तर फारच मौल्यवान
लोकांना दिसले तर मंत्र्याचीच अब्रु जाणार
तुला तुझी बायको सांभाळता येत नसेल
तर जीव दे असं लोक म्हणणार
मग तुझ्या लक्षात आलं असतं
पुरुषाच्या नजरेतील तुझं बाई म्हणूनचं मूल्य

असतेच तुला मोठे स्तन पुरुषा
तर कुरवाळलं असतं त्यांना कित्येक पुरुषांनी
तू घातलेल्या अंगभर कपड्यांमधूनसुद्धा
धक्का दिला असता तुलाही गर्दीत
कुणा अनोळखी पुरूषानं
नेमका स्तनांना त्यांचा स्पर्श होईल असा
आणि हसला असता तुझ्याकड पाहून तो
अगदीच निर्विकार बेफिकीर

तुलाही वाटली असती तुझ्या स्तनांची लाज
उड्या मारताना चालताना
त्याची टोकांनी बिचाऱ्या पुरुषांच्या नजरा चाळवू नये म्हणून तूही घातल्या असत्या पॅडेड ब्रा
खांदे तुटेपर्यंत
तूही धरला असतास स्वतःचा गळा आवळून
खाली वाकताना
तूही प्रयत्न केले असतेस रात्रंदिन
तुझे स्तन कुणा पुरुषाच्या नजरेस पडू नयेत यासाठी
तुझ्या नितंबांच्या आकारानं ते
संकोचले जातात
पुरुषांनी बनवलेली धर्म संस्कृती भ्रष्ट होऊ नये
म्हणून
म्हणून झाकत बसला असतास घोळदार कपड्यात
स्वतःचं नॉर्मल शरीर

तुझ्या स्तनांना सावरणारी ब्रा
पुरुष पाहतील या भीतीनं
तू उन्हात सुकत घातली नसती
तुझ्या अंडरगारमेंटसारखी

गल्लीत तुला एकट्याला पाहून आलं असतं कुणीतरी मागून
झडप घालून चुरगाळंलं असत तुझ्या स्तनांना
आणि पसार झालं असतं क्षणार्धात
या धक्क्यातून तू कधीच सावरला नसता
तुला ती गल्ली आणि तुझे दुखरे स्तन रोज आठवत राहिली असते

तू ऊसाच्या फडात गवत काढत असताना
तुझ्या स्तनांवर लक्ष ठेवून असणाऱ्या
शेजारच्या बांधावरच्या एखाद्या दादानं
साधला असता डाव
तुला काही कळण्याआधी
तुला ढेकळात लोळवून
तो बिनदिक्कतपणे निघूनही गेला असता

तू रस्त्यावरून बायकोला घेऊन जाताना
चार पुरुष जमले असते
हातात कॅमेरे घेऊन
चारी बाजूंनी खेचले असते तुझे स्तन
मन भरेेस्तोवर निदयीपणे
तू जीव मुठीत धरून पळून गेला असतास
पुन्हा कधीही त्या वाटेवर न येण्यासाठी

आले असते बार वेश्यालयात
मोठ्या स्तनांचे असंख्य शौकीन
ओरबाडलं असतं तुझ्या स्तनांना दारू पिण्याच्या
कागदी नोटांच्या बदल्यात
तुझं माणूसपण मरताना पाहून
डोळे मारले असते त्यांनी आनंदानं चित्कारत

रोज रात्री रस्त्याच्या कडेला दिव्याखाली
तुझ्या वाढवलेल्या स्तनांचा आकार दाखवत तूही उभी असतास
पुरुषांनी हातांनी चाचपून आकाराची खात्री करत
मोजले असते तुझ्यासोबतच्या मैथुनाचे दाम

कुणीतरी उरावर बसतं आहे म्हणून
तूही दचकून उठला असतास रे
बेहिशेबी रात्री बेरात्री
तूही खाल्ल्या असत्या गोळ्या
अन मारले असते खेटे
डिप्रेशनच्या गोळ्यांसाठी डॉक्टरकडे

तुलाही भीती वाटली असती
प्रत्येक गल्ली बोळाची
ऊसाच्या फडाची
देवळाची
पुरुषांची
तू जपत राहिला असतास स्वतःला सीता बनून
देत राहिला असतास अग्निपरीक्षा
पुरुष मात्र नागवत राहिले असते
तुला भर दरबारात
मग श्रीकृष्णाच्या साडीनेही वाचवली नसती तुझी आब्रु
अशावेळी सगळेच पुरुष दुःशासन झाले असते!

हे पुरुषा,
एक गोष्ट नीट ऐक
तू बाई झाला असतास किंवा तुला मोठे स्तन असते
तर तुझ्या स्तनांवर पुरुषांनीच झडप घातली असती
बाईनं नाही!
बाईला कुणाचे स्तन किती मोठे
कुण्या बाई पुरुषानं काय कपडे घातले
की न घातले
यानं काहीही फरक पडत नाही!

बरं झालं पुरुषा,
तुला मोठे स्तन नाहीत
हेही बरंच झालं पुरुषा
तू स्त्री म्हणून जन्मला नाहीस!
वाचलास!

पण आता तू एक गोष्ट करू शकतो का बघ
तुला बाईसारखे मोठे स्तन असते तर
असा विचार करून
बाईच्या मोठ्या स्तनाचे भोग समजून घे

बाईला वाटू नये स्तनांचं ओझं
बाई असल्याचा होऊ नये पश्चात्ताप
तुझ्या निर्मळ नजरेनं
करशील का आश्वस्त बाईला
देशील तुझी साथ
फक्त माणूस म्हणून?
जमेल एवढं?
जमव.
तोवर मी चालत राहीन
स्वतः निवडलेल्या वाटेवरून
एकटीच. बिनधास्त!

लेखिका लिंग, लैंगिकता, संवाद, मानवी हक्क व महिलांचे हक्क या विषयांवर त्या कार्यरत आहेत.

Releated Posts

ऑनलाइन शिक्षणाचा भारतीय शिक्षण व्यवस्थेत प्रभाव

लेखक – प्रा.संतोष किरण माने गेल्या काही वर्षांत ऑनलाइन शिक्षणाची वाढ अत्यंत वेगाने झाली आहे. कोविड-१९ महामारीने शाळा-महाविद्यालय…

ByByEditorialसितम्बर 15, 2025

पावसातलं गाव – आठवणींच्या ओल्या छटा

लेखक – नीलिमा सरपोतदार, मंडणगड पाऊस आला की मनात दडलेली गावीची आठवण नकळत जागी होते. अंगणातले चिखलाचे डबके,…

ByByEditorialसितम्बर 15, 2025

कोकणातील दशावतार नाट्यकला – परंपरा आणि आजचं महत्त्व

लेखक – वैशाली पाटील , रोहा रायगड भारतीय संस्कृतीतील लोकनाट्य परंपरा ही समाजाच्या जीवनाशी घट्ट जोडलेली आहे. त्यात…

ByByEditorialसितम्बर 15, 2025

भारतातील डिजिटल पेमेंट्स क्रांती – अर्थव्यवस्थेला नवा वेग

भारतामध्ये मागील काही वर्षांत डिजिटल पेमेंट्समध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. नोटाबंदीपासून सुरू झालेली कॅशलेस अर्थव्यवस्थेची वाटचाल आता…

ByByEditorialसितम्बर 15, 2025
Image Not Found
Image Not Found

Gallery

फिडेल कॅस्ट्रो — क्रांती, सत्ता आणि व्यक्तिमत्वाची गुंफण
The Many Lives of Syeda Xलेखक: Neha Dixit
कोकणात नवरात्रोत्सवाची पारंपरिक धूम : रोहा तालुक्यात महिलांसाठी खास सांस्कृतिक कार्यक्रम
“दुष्काळानं होरपळलेला मराठवाडा आता पूरानं डुबला! हजारो कुटुंबं बेघर
आमदार बाई, पण फोटोबाजीवर स्टॉप! पती अधिकाऱ्याचं धडक पत्र व्हायरल
कर्जत आमदार महेंद्र थोरवे यांचा विजय कायम
माणगाव तालुक्यात बनावट चलनी नोटांचे रॅकेट उध्वस्त
ऑनलाइन गेमिंग अ‍ॅप घोटाळ्यात १९ कोटींचा भांडाफोड
अलिबागमध्ये बेकायदेशीर रेंटल बाईकवर रिक्षाचालक आक्रमक