konkandhara.com

Image

अलिबागमध्ये बेकायदेशीर रेंटल बाईकवर रिक्षाचालक आक्रमक

अलिबाग : पर्यटन नगरी अलिबागमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या बेकायदेशीर रेंटल बाईक व्यवसायामुळे स्थानिक परवानाधारक रिक्षाचालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर रिक्षाचालकांनी अलिबाग पोलीस स्टेशनला निवेदन देऊन या रेंटल बाईकवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

रिक्षाचालकांच्या मते, शहरात केवळ दोन परवानाधारकांना 10 ते 12 बाईक भाड्याने देण्याची परवानगी आहे. मात्र प्रत्यक्षात हेच परवानाधारक 40 ते 50 बाईक रस्त्यावर सोडत आहेत. तसेच अनेकजण कोणतेही परवाने न घेता बेकायदेशीरपणे रेंटल बाईकचा धंदा सुरू ठेवत आहेत, असा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकारामुळे अलिबागमधील पारंपरिक रिक्षा व्यवसायावर संकट ओढावले असून, अनेक रिक्षाचालक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनासाठी माजी उपनगराध्यक्षा अ‍ॅड. मानसी म्हात्रे आणि शेकाप तालुका प्रमुख सुरेश घरत यांच्या नेतृत्वाखाली रिक्षाचालक प्रतिनिधी मंडळाने अधीक्षक आँचल दलाल तसेच पोलीस निरीक्षक किशोर साळे यांना निवेदन दिले.

या वेळी अलिबाग ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी अफजल सय्यद, अमीन मुल्ला, पप्पू पडावे, शरद राऊत, स्वप्नील नाईक, मन्सूर आगा आणि संदीप म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

निवेदनात रिक्षाचालक संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर बेकायदेशीर रेंटल बाईकवर तातडीने कारवाई झाली नाही तर पुढील काळात मोठं आंदोलन छेडलं जाईल.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे