konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती खो-खो खेळाडू तेजस्विनी सनगले हिचे निधन
राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती खो-खो खेळाडू तेजस्विनी सनगले हिचे निधन

राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती खो-खो खेळाडू तेजस्विनी सनगले हिचे निधन

प्रतिनिधी : कोकणधारा

देवरूख (संगमेश्वर) : संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे गावची सुवर्णकन्या आणि राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती खो-खो खेळाडू तेजस्विनी सनगले हिचा कोल्हापूर येथे उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर तिच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू होते; मात्र बुधवारी रात्री उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली.

तेजस्विनी ही वांझोळे गावातून घडलेली एक आघाडीची खेळाडू होती. मागील काही वर्षांत वांझोळे गावाने खो-खो क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू या गावातून घडले आहेत. त्या परंपरेतील तेजस्विनी ही एक उज्ज्वल नाव होती.

अवघ्या १२ व्या वर्षी भुवनेश्वर (ओडिशा) येथे झालेल्या १४ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली होती. त्या स्पर्धेत तिने उत्कृष्ट कामगिरी करत संघाला सुवर्णपदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. जि.प. शाळेतील सर्वात कमी वयातील राष्ट्रीय खेळाडू म्हणूनही तिने विशेष नावलौकिक मिळवला होता.

उंचीने लहान असली तरी खेळातील चपळता, वेग आणि जिद्द यामुळे ती मैदानावर उठून दिसत असे. अनेक सामने तिने आपल्या संघासाठी जिंकून दिले होते. मात्र खो-खोच्या मैदानावर जिद्दीने लढणारी ही खेळाडू आयुष्याचा सामना हरली, ही बाब सर्वांना वेदना देणारी ठरत आहे.

तिच्या अकाली निधनामुळे सनगले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून वांझोळे गावासह संपूर्ण पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे. रत्नागिरी खो-खो परिवाराचीही ही मोठी हानी मानली जात आहे. संगमेश्वर तालुक्यातून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे