konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • चिपळूणमध्ये उद्या स्थानिक महिलांच्या गायनाचा स्वर तरंग कार्यक्रम नाट्य परिषद शाखा चिपळूणचे आयोजन
चिपळूणमध्ये उद्या महिलांच्या गायनाचा ‘स्वर तरंग’ कार्यक्रम | नाट्य परिषद आयोजन

चिपळूणमध्ये उद्या स्थानिक महिलांच्या गायनाचा स्वर तरंग कार्यक्रम नाट्य परिषद शाखा चिपळूणचे आयोजन

प्रतिनिधी : कोकणधारा

चिपळूण : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा चिपळूणच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या गायनाचा स्वर तरंग हा विशेष कार्यक्रम शनिवार, दि. १४ मार्च रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, महिला व बालकल्याण समिती सभापती रसिका देवळेकर, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती हर्षाली पवार, तसेच गायिका उत्तरा भागवत-साडविलकर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमासाठीची निवड प्रक्रिया दि. ४ मार्च रोजी संस्थेच्या कार्यालयात पार पडली. या निवड प्रक्रियेत एकूण २६ महिला तसेच काही गटांनी सहभाग नोंदवला होता. परीक्षक म्हणून श्री. सतीश कुंटे, श्री. राहुल साडविलकर आणि कोकण गंधर्व श्री. राजाभाऊ शेंबेकर यांनी काम पाहिले. या प्रक्रियेतून एकूण १६ महिलांची अंतिम निवड करण्यात आली.

प्रथमच स्थानिक महिलांसाठी अशा प्रकारचा गायनाचा कार्यक्रम नाट्य परिषदेच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत असून निवड प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. श्री. सतीश कुंटे यांनी सहभागी महिलांना मोलाचे मार्गदर्शनही केले.

उद्या स्थानिक महिलांच्या गायनाच्या होणाऱ्या या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी केले आहे.

Releated Posts

रत्नागिरीत अनधिकृत एल.ई.डी. मासेमारीवर कारवाई; ‘भराडी प्रसन्न’ नौका मत्स्यव्यवसाय विभागाकडून जप्त

रत्नागिरी: प्रतिनिधी मिरकरवाडा ते गणपतीपुळे दरम्यान नियमित सागरी गस्त घालत असताना मत्स्यव्यवसाय विभागाने अनधिकृत एल.ई.डी. (LED) लाईट लावून…

ByByEditorial अप्रैल 6, 2026

स्वप्ना यादव यांचा ‘बेस्ट सीईओ’ पुरस्काराने सन्मान, कोल्हापूरमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव; सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल

प्रतिनिधी : कोकणधारा कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या. आयोजित सहकारी पतसंस्थांचा महिला मेळावा शुक्रवारी (ता.…

ByByEditorial अप्रैल 5, 2026

खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश करणार; स्थानिक राजकारणात खळबळ

खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश करणार; स्थानिक राजकारणात खळबळ खेर्डी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे स्थानिक पातळीवरील…

ByByEditorial अप्रैल 5, 2026

“रत्नागिरीला १०० ‘राजमाता जिजाऊ’ बसेससीसीटीव्ही, अधिक आसन क्षमता; प्रवास होणार आरामदायी”

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : जिल्ह्यासह राज्यभरातील प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला…

ByByEditorial अप्रैल 5, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

रत्नागिरीत एलईडी मासेमारीवर कारवाई; ‘भराडी प्रसन्न’ नौका जप्त
चिपळूणच्या स्वप्ना यादव यांना कोल्हापूरमध्ये ‘बेस्ट सीईओ’ पुरस्कार; सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा गौरव.
खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश; स्थानिक राजकारणात खळबळ
रत्नागिरीला १०० ‘राजमाता जिजाऊ’ बसेस; अधिक सुविधा, आरामदायी प्रवास
मुंबई-विजयदुर्ग रो-रो बोट सेवा बंद; कमी प्रतिसाद आणि महागडे दर कारणीभूत
sangmeshwar-student-harassment-case-accused-arrested-devrukh
chiplun-water-pipeline-burst-repair-nihar-kovale-action
nivli-jaigad-road-trailer-accident-driver-case-filed
निवळी-जयगड मार्गावर १८ चाकी ट्रेलरचा अपघात; चालकावर गुन्हा दाखल