कोलाड ११ मे (शरद जाधव)
रायगड च्या भूमित छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेली ही पवित्र भूमी आहे .स्वराज्याला पहिला राजा देणारी भूमी असल्यामुळे आज प्रत्येक मराठी माणसाला प्रेरणा व अस्मिता येथून मिळत आहे.
याच रायगड जिल्ह्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह केला .आणि सामाजिक समतेचा एक नवा इतिहास लिहिला.यंदा त्याचा शताब्दी वर्षाने आपल्या सगळ्यांना माहिती आहे. समता स्वाभिमान सामाजिक न्यायाचा संदेश देणाऱ्या या महामानवाला मी मनापासून विनम्र अभिवादन करते.कोकण म्हणजे साक्षात देवभूमी निसर्गाने भरभरून दान दिलेली ही भूमी आणि कष्टाळू माणसाने घडलेली भूमी आहे .आदरणीय दादांचं कोकणावर जास्त प्रेम होतं
रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते उत्साहात पार पडल्यानंतर डॉ. सी डी देशमुख शहर सभागृहात आयोजित सभेस उपस्थित जनसमुदास मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
यावेळी रोहा शहराच्या विकासासाठी हाती घेतलेल्या प्रकल्पांमुळे शहराच्या प्रगतीला नवे बळ मिळणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री यांनी व्यक्त करत . आज ज्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले, ती केवळ बांधकामे नसून रोह्याच्या सर्वांगीण विकासाचा मजबूत पाया आहेत असे सांगितले.
या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, मुश्ताक अंतुले, स्नेहल जगताप, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल, रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, पंचायत समिती सभापती विजया पाशिलकर, रोहा अष्टमी नगरपरिषद नगराध्यक्षा वनश्री समीर शेडगे, मुरुड नगरपरिषद नगराध्यक्षा आराधना दांडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, अॅड. प्रविण ठाकूर, उमा मुंडे, उपसभापती संजय मांडलूसकर, प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तहसीलदार किशोर देशमुख, उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, तालुका अध्यक्ष विनोद पाशिलकर, कार्याध्यक्ष समीर शेडगे, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे राजीव साबळे, उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, सभापती राजेंद्र जैन महेंद्र दिवेकर,नीता हजारे, रवींद्र चाळके, नगरसेवक अजित मोरे, प्रशांत कडू, दिवेश जैन,स्नेहा आंब्रे, गौरी बाराटक्के, संजना शिंदे,डॉ प्रियांका धनावडे, अल्मास मुमेरे, पूर्वा मोहिते नंदकुमार म्हात्रे, रामचंद्र सकपाळ, स्वप्नील धनावडे, प्रेषित बारटक्के यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
त्या पुढे म्हणाल्या, “सुनील तटकरे व अदिती तटकरे यांना दादांनंतर रायगडकडे लक्ष दिले जाईल की नाही, अशी चिंता असेल; मात्र मी आज येथे स्पष्ट सांगते की, अजितदादांनंतर रोहा व रायगडकडे मी नक्कीच विशेष लक्ष देईन.” यावेळी त्यांनी रोहा शहरातील विविध नियोजित विकासकामांचे भूमिपूजन झाल्याची अधिकृत घोषणा केली.कार्यक्रमात रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. या कामांमुळे शहराच्या पायाभूत सुविधा मजबूत होऊन नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असल्याचे मत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले.उपस्थित नागरिकांनी मोठ्या उत्साहात कार्यक्रमाला प्रतिसाद दिला. रोह्याच्या विकासाला नवी गती देणारा हा कार्यक्रम ठरल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त करण्यात आली.















