बांदा दोडामार्ग मार्गावर हेदुस येथे दुर्दैवी घटना
दोडामार्ग : प्रतिनिधी
Dodamarg तालुक्यातील हेदुस परिसरात एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका सेवानीवृत्त नौदल कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप तुकाराम हळणकर (वय ६८, रा. कुडासे-वानोसरी) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते भारतीय नौदलातून सुमारे २० वर्षांपूर्वी सेवानीवृत्त झाले होते. अपघाताच्या वेळी ते आपल्या दुचाकीवरून जात असताना पणजीहून धाराशिवकडे जाणाऱ्या एसटी बसने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की हळणकर यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात बस चालक राहुलसिंह पांडुरंग हालके (वय ३७) आणि वाहक सुधीर अशोक लोखंडे हे बसमध्ये होते.
घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, दोडामार्ग पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.















