konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • “सावंतवाडी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा मार्ग मोकळा !” — आरोग्यमंत्री बैठकीत मोठे निर्णय ; सिंधुदुर्गातील आरोग्य व्यवस्थेला मिळणार नवे बळ
Image

“सावंतवाडी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा मार्ग मोकळा !” — आरोग्यमंत्री बैठकीत मोठे निर्णय ; सिंधुदुर्गातील आरोग्य व्यवस्थेला मिळणार नवे बळ

दोडामार्ग: भूषण सावंत : मुंबईतील आरोग्य भवनात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित आरोग्य प्रश्नांवर अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सावंतवाडीचे आमदार दिपक केसरकर यांच्या मागणीनुसार आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यातील आरोग्य सुविधांबाबत मोठे निर्णय घेण्यात आले.

सावंतवाडी येथे प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालयांतील डॉक्टर व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, महात्मा फुले आरोग्य योजनेतील अडथळे, पंचकर्म केंद्रे, आयुष वेलनेस क्लिनिक आणि आरोग्य केंद्रांच्या इमारतींसाठी निधी अशा विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.

बैठकीला आमदार दीपक केसरकर यांच्यासह जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, राजघराण्याचे युवराज लखमराजे भोसले, कुमार भोगले, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेतील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

सात वर्षांपासून रखडलेल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला अखेर गती

सावंतवाडीतील बहुचर्चित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उभारणीचा प्रश्न यावेळी केंद्रस्थानी होता. जागेचा विषय न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे या प्रकल्पाचे काम अनेक वर्षांपासून रखडले होते. मात्र बैठकीत राजघराण्याच्या प्रतिनिधींनी हॉस्पिटल उभारणीस कोणतीही हरकत नसल्याचे स्पष्ट करत लवकरात लवकर न्यायालयात ना हरकत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सहमती दर्शवली.

यामुळे सावंतवाडी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उभारणीचा मार्ग आता जवळपास मोकळा झाल्याचे मानले जात आहे. तब्बल सात वर्षे प्रकल्प रखडल्याने नव्याने अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश आरोग्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच प्रस्तावित हॉस्पिटललगत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीला दोन मजली विस्तार देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले.

रिक्त डॉक्टर पदांवर महिनाभरात भरतीचे आदेश

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक रुग्णालयांमध्ये डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांची पदे दीर्घकाळ रिक्त असल्याने आरोग्य सेवा विस्कळीत झाल्याचा मुद्दा बैठकीत जोरदारपणे मांडण्यात आला.

यावर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी तातडीची दखल घेत वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे येत्या महिनाभरात भरण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले. परिचारिकांच्या रिक्त पदांमुळे निर्माण झालेल्या अडचणींवरही गंभीर चर्चा झाली असून त्यावर तातडीने तोडगा काढण्याचे निर्देश देण्यात आले.

गोवा व बेळगावमधील महात्मा फुले योजनेची सेवा पुन्हा सुरू होणार ?

सिंधुदुर्गातील रुग्णांना गोवा मेडिकल कॉलेज आणि के.एल.ई. हॉस्पिटल बेळगाव येथे महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचार मिळत होते. मात्र पोर्टलवरील कोड बंद झाल्यामुळे ही सुविधा थांबवण्यात आली असून त्यामुळे सीमाभागातील रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.

हा गंभीर प्रश्न आमदार दीपक केसरकर यांनी बैठकीत आक्रमकपणे मांडला. त्यावर आरोग्यमंत्री आबिटकर यांनी लवकरात लवकर ही सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिले.

रेडी, आंबोली आणि आचरा येथे पंचकर्म केंद्र उभारणीला गती

पर्यटन जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्गमध्ये आयुर्वेद, योग, पंचकर्म आणि नेचरोपॅथी सेवांसाठी मोठी मागणी आहे. याच पार्श्वभूमीवर रेडी, आंबोली आणि आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पंचकर्म सुविधा केंद्र सुरू करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली.

जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी ही मागणी लावून धरल्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी संबंधित प्रस्तावांना तातडीने मंजुरी देण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश दिले. तसेच रेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात आयुष वेलनेस सेंटर सुरू करण्याबाबतही सकारात्मक भूमिका घेण्यात आली.

आरोग्य सुविधांबाबत सरकार गंभीर ; सिंधुदुर्गला दिलासा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांच्या इमारती, कर्मचारी भरती, आधुनिक आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर या बैठकीत व्यापक चर्चा झाली.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्ह्यातील आरोग्य समस्यांवर लवकरात लवकर ठोस तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे