konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • दोडामार्ग तालुक्यातील सासोली येथे शेती व बागायती परिसरात अचानक आग लागली. नगरपंचायत व अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.
दोडामार्ग तालुक्यातील सासोली येथे शेती व बागायती परिसरात अचानक आग लागली. नगरपंचायत व अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.

दोडामार्ग तालुक्यातील सासोली येथे शेती व बागायती परिसरात अचानक आग लागली. नगरपंचायत व अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.

दोडामार्ग / भूषण सावंत

दोडामार्ग : तालुक्यातील सासोली गावातील शेती व बागायती परिसरात अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती सोसायटी अध्यक्ष मनोज गवस यांनी माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक संतोष नानचे यांना दिली.


माहिती मिळताच संतोष नानचे यांनी तत्काळ कसई-दोडामार्ग नगरपंचायत प्रशासनाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर नगरपंचायत प्रशासन व अग्निशमन दलाचा बंब तातडीने घटनास्थळी पोहोचला. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी तत्परतेने कारवाई करत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे संभाव्य मोठे नुकसान टळले.


घटनास्थळी ग्रामस्थांनीही मदत करत आग विझविण्यासाठी सहकार्य केले. वेळीच मिळालेल्या माहितीमुळे आणि अग्निशमन दलाच्या जलद प्रतिसादामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.


यावेळी सासोली ग्रामस्थांनी नगरसेवक संतोष नानचे तसेच कसई-दोडामार्ग नगरपंचायत प्रशासन व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

 

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे