konkandhara.com

सरंद येथे बुद्ध विहार भूमिपूजन सोहळा उत्साहात; आमदार शेखर निकम उपस्थित

सरंद येथे बुद्ध विहार भूमिपूजन सोहळा उत्साहात

संगमेश्वर : तालुक्यातील मौजे सरंद येथे बहुजन विकास मंडळ, मुंबई व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध विहाराच्या भूमिपूजनाचा सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते पार पडलेले भूमिपूजन होय.

यावेळी बोलताना आमदार शेखर निकम म्हणाले, “बुद्ध विहार हे केवळ धार्मिक स्थळ नसून समाजाला दिशा देणारे केंद्र आहे. येथे विचारांची देवाणघेवाण, शिक्षण आणि सामाजिक एकात्मता वाढीस लागेल. अशा उपक्रमांमुळे गावाचा सर्वांगीण विकास साध्य होईल. आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रगतीचा मार्ग स्वीकारला पाहिजे.”

कार्यक्रमाला दीपक जाधव, जि. प. सदस्य सुशील भायजे, प्रिया सुर्वे, संजय कदम, नाना कांगणे, शेखर उकर्डे, सोनाली जाधव, तुकाराम मेस्त्री, उमेश पवार, नंदन भागवत, अक्षय चव्हाण, गोपाळ जाधव, महेंद्र जाधव, राजेश जाधव, विवेक जाधव, महेंद्र अमर जाधव, तुकाराम जाधव, नवनाथ जाधव, अंजली जाधव, रश्मी जाधव, जगदीश जाधव तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमामुळे परिसरात सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक वातावरणाला चालना मिळून विकासाची नवी दिशा निर्माण होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Releated Posts

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार

रत्नागिरी : दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. यानिमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध…

ByByEditorial मई 15, 2026

सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी

प्रलंबित वॉटर पाईपलाईन कामावरून आमदार दिपक केसरकर, नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोंसले यांनी कंत्राटदारांना धरले धारेवर सावंतवाडी : भूषण…

ByByEditorial मई 15, 2026

भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरातून २१ हजारांहून अधिक नागरिकांना दिलासा सिंधुदुर्ग : भूषण सावंत : अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना…

ByByEditorial मई 15, 2026

रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे

तालुकास्तरीय कृषी मेळाव्याला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद कोलाड (शरद जाधव ) जिल्ह्यातील काही तालुक्यांत कृषी मिळावे आयोजीत झाले, त्यातील…

ByByEditorial मई 15, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे
वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू.
रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
‘माझ्या माहेरच्या साडी’च्या मानकरी ठरल्या कमल नाईक
लोकशाहीचा गळा घोटणारे राजभवन | संघराज्य रचनेसमोरील मोठे आव्हान