konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • रोहे शहरात उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी येणार. फुलांचे शहर बनवण्यासाठी नगरपालिकेची धावपळ.
Image

रोहे शहरात उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी येणार. फुलांचे शहर बनवण्यासाठी नगरपालिकेची धावपळ.

कोलाड १० मे (शरद जाधव)

रोहे शहरांमध्ये सुमारे पंधरा कोटीच्या विकास कामांच्या निधीच्या भूमिपूजन सोहळ्याकरता राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार येणार आहेत. त्यामुळे रोहे शहराच्या मुख्य रस्त्यावर फुलांची झाडे लावून. रोहा फुलांचे शहर बनवण्याकरता नगरपालिकेची धावपळ सुरू असल्याचे दिसून येत आहे.

दिवंगत लोकनेते अजित दादा पवार रोह्यात वारंवार विकास कामांच्या सोहळ्या करता येत असत. परंतु त्यांना रोहे शहर हे झाडा फुलांचे शहर कधी दिसले नाही. आणि आता सुनेत्रा वहिनी पहिल्यांदाच रोहे शहरात विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी येत असल्याने फुलांच्या झाडामुळे थोडाफार का होईना बारामती लुक त्यांना वाटला पाहिजे याकरता रोहा नगरपालिकेची झाडे लावण्याकरता धावपळ उडाली असल्याचे. दिसून येते.

रोहा नगरपालिकेवर वनश्री शेडगे नगराध्यक्षपदी विराजमान होताच विकास कामांना सुरुवात झाली आहे. रोहे शहरातील काही प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा मार्ग काढण्याचा प्रयत्न होत आहे. शहराच्या सांडपाण्याने कुंडलिका प्रदूषित होते असा आवाज संघर्ष समिती दिलीप वडके यांनी उठविला होता. याची दखल घेत नदीचे संवर्धन करण्याकरता खूप मोठा निधी सुनील तटकरे यांनी आणला आहे. आज ज्येष्ठ पत्रकार दिलीप वडके यांच्यासारखी चळवळीतली माणसे समाजात काम करीत असल्याने लोकप्रतिनिधी व सत्ताधाऱ्यांवर अंकुश आहे.

उद्या सुनेत्रा वहिनी येणार म्हणून घाई घाईत झाडे लावण्याची गरज नव्हती. लावत असलेली झाडे ही येणाऱ्या पाहुण्यांना दाखवण्यासाठी लावण्यात येत आहेत अशी शंका रोहेकर व्यक्त करीत आहेत. आजच्या दिवसात झाडे सर्व लावली जातील व निश्चितच फुलांचे शहर म्हणून सुमित्रा वहिनींना आनंद वाटेल परंतु आता लावलेली झाडे जगवण्याचे काम रोहा नगरपालिकेने प्रामाणिक करावे. नगराध्यक्ष वनश्री शेडगे यांचे रोहे शहरातील विविध विकास कामांवर जातीने लक्ष असल्याने त्या निश्चित फुलांचे शहर म्हणून ही झाडे जगवतील असा विश्वास त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे