दापोली शिक्षण संस्था संचालित ए.जी. हायस्कूलची कुमारी रिद्धीमा सुदेशकुमार चव्हाण हिने नुकत्याच लागलेल्या एसएससी परीक्षेत दापोली तालुक्यात 100 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त करून यशाची परंपरा कायम राखली आहे.
विद्यालयतून एकूण 262 विद्यार्थी परीक्षेत बसले होते पैकी 255 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन विद्यालयाचा निकाल 97.32% इतका लागला आहे. यामध्ये प्रथम क्रमांक रिद्धीमा सुदेशकुमार चव्हाण 100 टक्के, द्वितीय क्रमांक नीळ उदय फडके 96.20 टक्के, तृतीय क्रमांक क्रांति विरेंद्र केळस्कर 95.40 टक्के, चौथा क्रमांक पल्लवी विजय भुवड 94.80 टक्के तर पाचवा क्रमांक सई आशिष शिगवण 94.60 टक्के गुण मिळवून विद्यालयामध्ये अनुक्रमे क्रमांक प्राप्त केले आहेत. तर 80% च्या वरती तब्बल 48 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रसाद करमरकर, कार्यवाह डॉ. विनोद जोशी, सर्व संचालक मंडळ, शालेय समिती चेअरमन श्री. रवींद्र कालेकर, सदस्य श्रीकांत निजामपूरकर, सदस्या सौ.स्मिता सुर्वे,मुख्याध्यापक एस.एम. कांबळे, उपमुख्याध्यापक श्री. अर्जुन घुले, पर्यवेक्षक श्री. अनिल पेठकर, श्री. मगदूम एस.आय. सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग यांनी विशेष कौतुक केले आहे.















