konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • पैसे दिले नाही म्हणून मारहाण करत वडिलांना दुसर्या मजल्यावरून पाडले खाली
Image

पैसे दिले नाही म्हणून मारहाण करत वडिलांना दुसर्या मजल्यावरून पाडले खाली

कुवारबाव येथील घटना; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरातील कुवारबाव येथे माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना घडली. खर्चासाठी मागितलेले पैसे दिले नाहीत या रागातून मुलाने आपल्या वडिलांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. या झटापटीत वडील पडक्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रणय मनोज सणस (2१, रा. कुवारबाव, रत्नागिरी) असे धक्काबुक्की करणाऱ्या मुलाचे नाव आहे. ही घटना शनिवार २५ एप्रिल रोजी सायंकाळी 5 वा.सुमारास कुवारबाव येथील संगम हॉटेलच्या मागील पडक्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर घडली. फिर्यादी मनोज प्रभाकर सणस (५३, रा. वाई, सातारा, सध्या रा. कुवारबांव) हे कुकिंगचा व्यवसाय करतात. शनिवारी सायंकाळी ते व मुलगा प्रणय सणस हे कुवारबांव येथील संगम हॉटेलच्या मागील एका पडक्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर बसले होते. त्यावेळी मुलगा प्रणय याने वडिलांकडे खर्चासाठी २००० रुपयांची मागणी केली. वडिलांनी “माझ्याकडे एवढे पैसे नाहीत, मी फक्त २०० रुपये देऊ शकतो” असे सांगितले. आपल्या मागणीपेक्षा कमी पैसे मिळत असल्याचा राग आल्याने प्रणयचा संयम सुटला. पैसे देण्यास नकार दिल्याने प्रणयने वडिलांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि तो त्यांच्या अंगावर धावून गेला. त्याने केलेल्या धक्काबुक्कीमुळे मनोज सणस यांचा तोल गेला आणि ते पडक्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून थेट जमिनीवर पडले. या भीषण अपघातात त्यांच्या शरिराला गंभीर दुखापत झाली. दुसऱ्या मजल्यावरून पडल्यानंतर जखमी मनोज सणस रात्रभर तिथेच पडून होते. दुसऱ्या दिवशी रविवार २६ एप्रिल रोजी यांनी आपले मित्र दीपक घाटगे यांना बोलावून घेतले. त्यानंतर १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रुग्णालयात उपचार सुरू असताना पोलिसांनी मनोज सणस यांचा जबाब नोंदवून घेतला. अधिक तपास शहर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार पी. के. पाटील करत आहेत.

Releated Posts

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार

रत्नागिरी : दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. यानिमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध…

ByByEditorial मई 15, 2026

सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी

प्रलंबित वॉटर पाईपलाईन कामावरून आमदार दिपक केसरकर, नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोंसले यांनी कंत्राटदारांना धरले धारेवर सावंतवाडी : भूषण…

ByByEditorial मई 15, 2026

भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरातून २१ हजारांहून अधिक नागरिकांना दिलासा सिंधुदुर्ग : भूषण सावंत : अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना…

ByByEditorial मई 15, 2026

रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे

तालुकास्तरीय कृषी मेळाव्याला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद कोलाड (शरद जाधव ) जिल्ह्यातील काही तालुक्यांत कृषी मिळावे आयोजीत झाले, त्यातील…

ByByEditorial मई 15, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे
वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू.
रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
‘माझ्या माहेरच्या साडी’च्या मानकरी ठरल्या कमल नाईक
लोकशाहीचा गळा घोटणारे राजभवन | संघराज्य रचनेसमोरील मोठे आव्हान