konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • रत्नागिरीत आंबा व्यावसायिकाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या कर्जबाजारीपणाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती
रत्नागिरीत आंबा व्यावसायिकाची आत्महत्या; कर्जाच्या ताणातून टोकाचे पाऊल

रत्नागिरीत आंबा व्यावसायिकाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या कर्जबाजारीपणाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती

रत्नागिरी : प्रतिनिधी


आंबा व्यापारी आणि ‘हापूस ॲग्रो’चे संचालक रुपेश प्रकाश उर्फ बाब्या नागवेकर (५०, रा. तोणदे) यांनी सोमवारी सकाळी आपल्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. कर्जाचा ताण आणि सावकारी जाचामधून हे टोकाचे पाऊल उचलले गेल्याची प्राथमिक माहिती असून, या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सोमवार सकाळी १०.३० च्या सुमारास रुपेश नागवेकर यांच्या पत्नी सौ. प्राची नागवेकर या मुलाला घेऊन बाहेर गेल्या होत्या. त्यानंतर साधारण ११ वाजता त्यांच्या घरात कामासाठी आलेल्या महिलेला रुपेश नागवेकर हे घराच्या अंगणातील खुर्चीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. हे भीषण दृश्य पाहून त्या महिलेने आरडाओरड केली, त्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

रुपेश नागवेकर यांनी शेती संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या बंदुकीने स्वतःवर गोळी झाडून घेतली होती. गोळी हनुवटीतून थेट डोक्यात घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर, ग्रामीण पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव आणि फॉरेन्सिक टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

नागवेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. दरम्यान, रुपेश नागवेकर यांच्यावर कर्जाचा मोठा ताण होता आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांना पैशांसाठी सतत फोन येत होते, अशी माहिती समोर येत आहे.

माझा भाऊ कर्जाच्या प्रचंड ताणाखाली होता. त्याला गेल्या काही दिवसांपासून कोणाकोणाचे फोन आले याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सीडीआर (CDR) काढून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी मृतक रुपेश नागवेकर यांचे भाऊ दीपक उर्फ बंधू नागवेकर यांनी केली आहे

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे