konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • रत्नागिरीत गॅस एजन्सीत गैरप्रकार उघड; गोडावून कीपरकडून ५ व्यावसायिक सिलिंडरची अवैध विक्री
रत्नागिरीत गॅस एजन्सीत गैरप्रकार उघड; गोडावून कीपरकडून ५ व्यावसायिक सिलिंडरची अवैध विक्री

रत्नागिरीत गॅस एजन्सीत गैरप्रकार उघड; गोडावून कीपरकडून ५ व्यावसायिक सिलिंडरची अवैध विक्री

प्रतिनिधी : कोकणधारा

रत्नागिरी : शहरातील एका गॅस एजन्सीत गोडावून कीपरने पाच व्यावसायिक गॅस सिलिंडरची परस्पर अवैध विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी संबंधित एजन्सीकडून जिल्हा प्रशासन तसेच शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, यापैकी चार सिलिंडर परत मिळवण्यात आले आहेत.
सध्या देशातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी व्यावसायिक सिलिंडरच्या विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सींना याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून, केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच व्यावसायिक सिलिंडर पुरवण्यास परवानगी आहे.

रत्नागिरी शहरातील संबंधित गॅस एजन्सीकडे २४ व्यावसायिक सिलिंडरचा साठा उपलब्ध होता. मात्र, गोडावून कीपरने एजन्सी व्यवस्थापकांना कोणतीही माहिती न देता त्यापैकी पाच सिलिंडरची अवैध विक्री केल्याचे समोर आले. हा प्रकार लक्षात येताच एजन्सीकडून तातडीने कारवाई करण्यात आली आणि चार सिलिंडर परत मिळवण्यात यश आले.

या प्रकरणी एजन्सीच्या व्यवस्थापक प्रीती राज यांनी जिल्हा पुरवठा विभागाकडे तसेच शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून, पुढील तपास सुरू आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे