konkandhara.com

Image

चर्मालय ते कोकणनगर मार्गावरील अतिक्रमणे हटवली

रत्नागिरी नगर परिषदेची धडक कारवाई; ८० बांधकामे जमीनदोस्त

रत्नागिरी, प्रतिनिधी : रत्नागिरी नगर परिषदेने बुधवारी शहरातील चर्मालय ते कोकणनगर मार्गावरील बहुचर्चित अतिक्रमणांवर मोठी कारवाई करत तब्बल ८० अनधिकृत बांधकामे हटवली. सकाळपासून सुरू झालेल्या या मोहिमेत नगरपालिकेच्या पथकाने जेसीबीच्या सहाय्याने परिसरातील अनधिकृत दुकाने आणि पक्की बांधकामे जमीनदोस्त केली.

चर्मालय ते कोकणनगर हा शहरातील अत्यंत वर्दळीचा मुख्य मार्ग असून, रस्त्याच्या दुतर्फा उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांमुळे रस्ता रुंदीकरणाच्या कामात मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. तसेच, ११ केव्ही भूमिगत उच्चदाब विद्युत वाहिनी टाकण्याचे महत्त्वाचे कामही या अतिक्रमणांमुळे रखडले होते.

ही कारवाई काही दिवसांपूर्वीच होणार होती. मात्र, सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन प्रशासनाने ती तात्पुरती पुढे ढकलली होती. त्यावेळी संबंधित दुकानदारांनी स्वतःहून अतिक्रमणे हटवण्यासाठी मुदत मागितली होती. प्रशासनाने दिलेल्या मुदतीनंतरही अतिक्रमणे कायम असल्याने अखेर नगर परिषदेला कठोर पावले उचलावी लागली.

बुधवारी सकाळी नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, जेसीबी मशीन आणि आवश्यक फौजफाट्यासह चर्मालय-कोकणनगर परिसरात दाखल झाले. कोणतीही पूर्वसूचना न देता सुरू झालेल्या या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांमध्ये एकच धावपळ उडाली.

या कारवाईमुळे आता ११ केव्ही भूमिगत विद्युत वाहिनीचे काम वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार असून, रस्ता रुंदीकरणाचाही मार्ग मोकळा झाला आहे. प्रशासनाच्या या धडक कारवाईची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे