konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • अमृतवेल सोशल फाउंडेशनच्या सहभागातून पिंगळसई शाळेचा कायापाल.
Image

अमृतवेल सोशल फाउंडेशनच्या सहभागातून पिंगळसई शाळेचा कायापाल.

डागडुजी व रंगकामाने शाळेला आले नवे रूप

कोलाड दि.५ मे (शरद जाधव)

ग्रामीण भागातील शिक्षणाचा कणा असलेल्या पिंगळसई जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा चेहरामोहरा आता पूर्णपणे बदलला आहे.गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्थेत असलेल्या या शाळेची नुकतीच अमृतवेल सोशल फाउंडेशनच्या सहभागातून मोठ्या प्रमाणावर डागडुजी करण्यात आली असून,आकर्षक रंगकामामुळे ही शाळा आता खासगी शाळांच्या तोडीस तोड दिसू लागली आहे.
शाळेच्या इमारतिचे छतातून पाणी गळन्याची किरकोळ कामे,भिंतींवरील जुना प्लास्टर काढून नवीन सिमेंटचे अस्तर लावून तडे बुजवण्यात आले आणि खिडक्यांची तावदाने फुटणे अशा समस्या निर्माण झाल्या होत्या.यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.ही बाब लक्षात घेऊन अमृतवेल सोशल फाउंडेशन यांनी एकत्र येत शाळेच्या नूतनीकरणाचा विडा उचलला.शाळेच्या बाह्य भिंतींना प्रसन्न देणारा पीवळा आणि पांढरा रंग देण्यात आला आहे, तर आतील भिंतींवर अभ्यासाशी संबंधित चित्रे रेखाटण्यात आली आहेत.भिंतीवर सुविचार,सूचना फलक आणि फळ्यांचे रंगकाम असे सर्व काम करून घेण्यात आले.या ‘बोलक्या भिंतींमुळे’ विद्यार्थ्यांना खेळता-खेळता शिक्षण मिळण्यास मदत होणार आहे.


या उपक्रमासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष सौरभ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कमिटी अध्यक्ष सचिन मोरे,शिक्षण विभाग अध्यक्ष सूरज तुळवे यांसह सहकारी वर्गाने श्रमदान आणि आर्थिक मदत केली.”शाळेचे रूप पालटल्यामुळे मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढण्यास मदत होईल,”असा विश्वास मुख्याध्यापकांनी व्यक्त केला आहे.तर शाळेला दिलेल्या रंगाचे ध्येय विद्यार्थ्यांच्या आयुष्यात रंग यावे आणि त्यांनीही भविष्यात सुजाण नागरिक होऊन देशाचे चांगले भविष्य घडवावे असे मत कमिटी अध्यक्ष सचिन मोरे,शिक्षण विभागाचे सूरज तुळवे यांनी व्यक्त केले.या कामांचे सर्वत्र कौतुक होत असून,ही शाळा आता पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरली आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे