konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • पेजे अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘बाटू’ उपकेंद्रासाठी तात्काळ कार्यवाही करा – पालकमंत्री उदय सामंत
प्रतिनिधी : कोकणधारा

पेजे अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘बाटू’ उपकेंद्रासाठी तात्काळ कार्यवाही करा – पालकमंत्री उदय सामंत

प्रतिनिधी : कोकणधारा

रत्नागिरी : लोकनेते शामराव पेजे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (बाटू) चे उपकेंद्र तात्काळ सुरू करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिल्या.

आज पेजे अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकी महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतनच्या कामकाजाचा व विविध अडचणींचा आढावा घेण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, प्रांताधिकारी जीवन देसाई, जि.प. सदस्य बाबू म्हाप, शासकीय तंत्रनिकेतनचे प्रभारी प्राचार्य अजय हुंबरीकर, प्रा. पियुष गजबे, प्रा. उत्तमसखाने काकडे उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य यू. व्ही. पाटील व ‘बाटू’चे कुलगुरू कारभारी काळे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.


बैठकीत महाविद्यालयातील कर्मचारी, विद्यार्थी संख्या, प्रवेश प्रक्रिया, वसतिगृह सुविधा आदी विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री सामंत यांनी उपकेंद्रासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासोबत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह तातडीने सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.


“महाविद्यालय परिसर स्वच्छ आणि सुस्थितीत ठेवावा. पुढील शनिवारी पुन्हा भेट देणार असून त्यापूर्वी स्वच्छता व आवश्यक कामे पूर्ण करावीत,” असे निर्देशही त्यांनी दिले.
तत्पूर्वी पालकमंत्री सामंत यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कामकाजाचाही आढावा घेतला.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे