konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • कोकणातील परीट (धोबी)मडवळ समाजाचा राज्यस्तरीय मेळावा ३ मे रोजी रोह्यात
Image

कोकणातील परीट (धोबी)मडवळ समाजाचा राज्यस्तरीय मेळावा ३ मे रोजी रोह्यात

कोलाड दिनांक १ एप्रिल ( शरद जाधव)

महाराष्ट्र प्रदेश कोकण परीट (धोबी) मंडळ समाज संघ यांच्या वतीने कोकणाचा १ ला भव्य मेळावा (राज्यस्तरीय) आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा रविवार, दि. ३ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता रोहा येथील डॉ. सि. डि. देशमुख शहर सभागृह, रोहा नगरपरिषद समोर, मु. पो. रोहा, जि. रायगड येथे पार पडणार आहे.

समाज संघटनेच्या बळकटीसाठी, विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी तसेच कोकणातील परीट समाजाला एकत्र आणण्याच्या उद्देशाने या राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. शांताराम (भाऊ) सहदेव कदम भूषविणार असून ते महाराष्ट्र प्रदेश कोकण परीट (धोबी) मंडळ समाज संघाचे अध्यक्ष आहेत. तसेच कार्यक्रमासाठी विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या मेळाव्याद्वारे समाजातील शिक्षण, रोजगार, सामाजिक ऐक्य, युवकांचे सक्षमीकरण आणि महिलांच्या सहभागाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच विविध तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी विशेष तयारी केली आहे.

मेळाव्यास समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कोकण खजिनदार नंदकिशोर राक्षे, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र कान्हेकर, रायगड जिल्हा अध्यक्ष दीपक कदम व संघटक संजय गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे