देवरूख : देवरूख-रत्नागिरी मार्गावरील पांगरी येथील वळणाजवळ रविवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलचा भीषण अपघात झाला. या अपघातात हातखंबा बौद्धवाडी येथील विकास काशिराम कांबळे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच देवरूख पोलीस ठाण्याचे निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नामदेव जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मेधा बोंद्रे, पोलीस हवालदार सचिन पवार तसेच पोलीस कॉन्स्टेबल नितीन बोंडवे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी जखमींना तातडीने उपचारासाठी रत्नागिरी येथे हलवले. तसेच अपघातस्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.















