konkandhara.com

Image

कामगारांसाठी पाकळे फाऊंडेशनचा प्रेरणादायी उपक्रम

आमदार चषक 2026 मध्ये 300 कूपनचा लकी ड्रॉ; कंपनीला लागलेली मोटारसायकल कामगारांना अर्पण
चिपळूण :संदिप घाग
शेखर निकम प्रतिष्ठान आयोजित आमदार चषक 2026 स्पर्धेनिमित्त उद्योगपती सचिन पाकळे यांनी 300 कूपन खरेदी करून लकी ड्रॉमध्ये सहभाग घेतला होता. या सोडतीत त्यांच्या कंपनीच्या नावावर मोटारसायकल लागली. मात्र, ही मोटारसायकल स्वतःकडे न ठेवता कामगारांना देण्याचा निर्णय घेत त्यांनी कंपनीतील कामगारांमधून स्वतंत्र लकी ड्रॉ काढत सामाजिक बांधिलकी जपली.
चिपळूण-संगमेश्वरचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांच्या हस्ते ही सोडत पार पडली. सुभाष पाकळे फाऊंडेशनच्या माध्यमातून सचिन कात कंपनी व तिरुपती कात कंपनी, तसेच सचिन पाकळे व संजय पाकळे यांनी हा कामगाराभिमुख उपक्रम राबविला.
कामगारांमधून काढलेल्या या विशेष लकी ड्रॉमध्ये एका भाग्यवान कामगाराला मोटारसायकल प्रदान करण्यात आली. याशिवाय मिक्सर, कुकर, हॉटपॉट, स्टील डबे, पाण्याच्या टाक्या, टॉर्च, इस्त्री, ब्लूटूथ स्पीकर, गॅस शेगडी, सिलिंग फॅन आदी वस्तूंचेही वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास पूनम पाकळे, इरा डेव्हलपमेंटचे सुरेश सावर्डेकर, महावितरणचे निवृत्त अधिकारी अशोक काजरोळकर, शेखर निकम प्रतिष्ठानचे देवराज गरगरटे, सतीश सावर्डेकर, राजेश सुर्वे, विकास भंडारी, सुमित भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार शेखर निकम, उद्योगपती सचिन पाकळे तसेच सचिन कात व तिरुपती कात कंपनीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संदिप घाग, सचिन गुरव, बाळा सावंत, सुयोग खेडेकर, सुरेश सूर्यवंशी, शरद चव्हाण, प्रणय चव्हाण, सुगंधा घाणेकर, सुरक्षा घाग, प्रणय साबळे, अनुराग चव्हाण, प्रणय मोरे, महेश सावंत, अमित म्हापार्ले, राहुल पवार, सुमित, सुजित बिजितकर आदींनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
कामगारांच्या हितासाठी राबविण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे