konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • पाचलमध्ये गॅस सिलिंडर काळाबाजार प्रकरण उघड; १०९४ गॅस कार्ड्स जप्त
पाचलमध्ये गॅस सिलिंडर काळाबाजार प्रकरण; १०९४ गॅस कार्ड्स जप्त

पाचलमध्ये गॅस सिलिंडर काळाबाजार प्रकरण उघड; १०९४ गॅस कार्ड्स जप्त

प्रतिनिधी : कोकणधारा

पाचल (वार्ताहर) : राजापूर तालुक्यातील पाचल परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राजापूर पुरवठा विभागाने बुधवारी संबंधित सर्व्हिस सेंटरवर धाड टाकत मोठी कारवाई केली.

या कारवाईत तब्बल १०९४ ग्राहकांची गॅस पुस्तिका (कार्ड) आणि एक कमर्शियल सिलिंडर जप्त करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती तहसीलदार विकास गंबरे यांनी दिली असून पुढील चौकशीसाठी प्रकरण जिल्हा पुरवठा विभागाकडे सोपवण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सर्व्हिस सेंटरकडून ग्राहकांकडून गॅस कार्ड्स जमा करून घेतली जात होती. या कार्ड्सच्या आधारे सिलिंडर बुक करून प्रत्यक्षात ग्राहकांना गॅस न देता तेच सिलिंडर जादा दराने विक्री केल्याचा संशय आहे. काही ग्राहकांच्या नावावर सिलिंडरची उचल दाखवली गेली, मात्र त्यांना गॅस मिळाला नसल्याने हा प्रकार उघड झाला.

१ एप्रिल रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता पुरवठा विभागाने छापा टाकून झाडाझडती घेतली असता मोठ्या प्रमाणात गॅस पुस्तिका आणि एक कमर्शियल सिलिंडर आढळून आला. सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, सर्व्हिस सेंटरच्या संचालकांनी ग्राहक स्वतःहून कार्ड्स ठेवून जात असल्याचे सांगितले असले, तरी इतक्या मोठ्या प्रमाणावर कार्ड्स सापडल्याने प्रशासनाने संशय व्यक्त केला आहे.

या कारवाईत पुरवठा निरीक्षक निलेश लाड, मंडल अधिकारी पूनम गावित, तलाठी नरके, शशिकांत कांबळे, लिपिक विक्रम पाटील, ग्रामवसूल अधिकारी कृष्णा गोरड, कोतवाल अमित चिले व पोलीस कॉन्स्टेबल निलेश कात्रे सहभागी झाले होते.

या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांतून होत आहे.

Releated Posts

रत्नागिरीत अनधिकृत एल.ई.डी. मासेमारीवर कारवाई; ‘भराडी प्रसन्न’ नौका मत्स्यव्यवसाय विभागाकडून जप्त

रत्नागिरी: प्रतिनिधी मिरकरवाडा ते गणपतीपुळे दरम्यान नियमित सागरी गस्त घालत असताना मत्स्यव्यवसाय विभागाने अनधिकृत एल.ई.डी. (LED) लाईट लावून…

ByByEditorial अप्रैल 6, 2026

स्वप्ना यादव यांचा ‘बेस्ट सीईओ’ पुरस्काराने सन्मान, कोल्हापूरमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव; सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल

प्रतिनिधी : कोकणधारा कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या. आयोजित सहकारी पतसंस्थांचा महिला मेळावा शुक्रवारी (ता.…

ByByEditorial अप्रैल 5, 2026

खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश करणार; स्थानिक राजकारणात खळबळ

खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश करणार; स्थानिक राजकारणात खळबळ खेर्डी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे स्थानिक पातळीवरील…

ByByEditorial अप्रैल 5, 2026

“रत्नागिरीला १०० ‘राजमाता जिजाऊ’ बसेससीसीटीव्ही, अधिक आसन क्षमता; प्रवास होणार आरामदायी”

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : जिल्ह्यासह राज्यभरातील प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला…

ByByEditorial अप्रैल 5, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

रत्नागिरीत एलईडी मासेमारीवर कारवाई; ‘भराडी प्रसन्न’ नौका जप्त
चिपळूणच्या स्वप्ना यादव यांना कोल्हापूरमध्ये ‘बेस्ट सीईओ’ पुरस्कार; सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा गौरव.
खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश; स्थानिक राजकारणात खळबळ
रत्नागिरीला १०० ‘राजमाता जिजाऊ’ बसेस; अधिक सुविधा, आरामदायी प्रवास
मुंबई-विजयदुर्ग रो-रो बोट सेवा बंद; कमी प्रतिसाद आणि महागडे दर कारणीभूत
sangmeshwar-student-harassment-case-accused-arrested-devrukh
chiplun-water-pipeline-burst-repair-nihar-kovale-action
nivli-jaigad-road-trailer-accident-driver-case-filed
निवळी-जयगड मार्गावर १८ चाकी ट्रेलरचा अपघात; चालकावर गुन्हा दाखल