konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • ओव्हरलोड ट्रकचा कहर! सावंतवाडी-वेंगुर्ला मार्गावर भीषण तिहेरी अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली
ओव्हरलोड ट्रकचा कहर; सावंतवाडी-वेंगुर्ला मार्गावर तिहेरी अपघातओव्हरलोड ट्रकचा कहर; सावंतवाडी-वेंगुर्ला मार्गावर तिहेरी अपघात

ओव्हरलोड ट्रकचा कहर! सावंतवाडी-वेंगुर्ला मार्गावर भीषण तिहेरी अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

सावंतवाडी : संजय पिळणकर
सावंतवाडी–वेंगुर्ला मार्गावरील कोलगाव येथे आज ओव्हरलोड ट्रकने बस आणि डंपरला धडक दिल्याने भीषण तिहेरी अपघात घडला. या अपघातात एसटी बस व डंपरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, आंबेगाव–सावंतवाडी ही एसटी बस सावंतवाडी बस स्थानकाच्या दिशेने जात होती. त्याचवेळी एक डंपर माडखोलच्या दिशेने मार्गक्रमण करत होता. दरम्यान, वेंगुर्ला बाजूकडून अंदाजे ७०० चिरा दगड भरून येणारा एक ट्रक समोरून आला. सदर ट्रक क्षमतेपेक्षा अधिक ओव्हरलोड असल्याने चालकाचा ताबा सुटला आणि अनियंत्रित झालेल्या ट्रकने प्रथम एसटी बसला व त्यानंतर डंपरला जोरदार धडक दिली.

या धडकेत बसच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले असून डंपरच्याही मागील बाजूस हानी पोहोचली आहे. अपघाताची माहिती मिळताच कोलगाव बीटचे हवालदार मनोज राऊत व सुरेश राऊळ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सुदैवाने बसमधील प्रवासी, चालक व वाहक थोडक्यात बचावले.

दरम्यान, या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात होणारी ओव्हरलोड वाहतूक हा गंभीर प्रश्न बनला आहे. प्रशासनाकडून अशा वाहनांवर कोणतीही कठोर कारवाई होत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ओव्हरलोड वाहतुकीमुळे निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने तातडीने कडक उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे