konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • नांदगावजवळ ‘हॉटेल पिकनिक पॉईंट’ला मध्यरात्री आग; जाळपोळीचा संशय
नांदगावजवळ ‘हॉटेल पिकनिक पॉईंट’ला मध्यरात्री आग; जाळपोळीचा संशय

नांदगावजवळ ‘हॉटेल पिकनिक पॉईंट’ला मध्यरात्री आग; जाळपोळीचा संशय

प्रतिनिधी : कोकणधारा

खेड : तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील नांदगावजवळ असलेल्या ‘हॉटेल पिकनिक पॉईंट’ला सोमवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत हॉटेल पूर्णपणे जळून खाक झाले असून सुमारे 50 हजार ते 1 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सामाजिक कार्यकर्ते जलाल राजपुरकर यांच्या मालकीचे हे हॉटेल असून रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ माहिती दिली, मात्र तोपर्यंत आगीने विक्राळ रूप धारण केल्याने संपूर्ण हॉटेल भस्मसात झाले होते.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आग लागण्यामागील कारणाबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. संबंधित मालकांनी ही आग जाणीवपूर्वक लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे.

काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी अवैधरित्या प्रवेश करून मद्यप्राशन करणाऱ्यांना पकडल्याची घटना घडली होती. त्यावेळी संबंधितांकडून धमकी व मारहाणीचा प्रयत्नही झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या आगीचा त्या घटनेशी संबंध असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणी अधिक तपास सुरू असून अज्ञात व्यक्तींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Releated Posts

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार

रत्नागिरी : दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. यानिमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध…

ByByEditorial मई 15, 2026

सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी

प्रलंबित वॉटर पाईपलाईन कामावरून आमदार दिपक केसरकर, नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोंसले यांनी कंत्राटदारांना धरले धारेवर सावंतवाडी : भूषण…

ByByEditorial मई 15, 2026

भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरातून २१ हजारांहून अधिक नागरिकांना दिलासा सिंधुदुर्ग : भूषण सावंत : अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना…

ByByEditorial मई 15, 2026

रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे

तालुकास्तरीय कृषी मेळाव्याला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद कोलाड (शरद जाधव ) जिल्ह्यातील काही तालुक्यांत कृषी मिळावे आयोजीत झाले, त्यातील…

ByByEditorial मई 15, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे
वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू.
रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
‘माझ्या माहेरच्या साडी’च्या मानकरी ठरल्या कमल नाईक
लोकशाहीचा गळा घोटणारे राजभवन | संघराज्य रचनेसमोरील मोठे आव्हान