konkandhara.com

  • Home
  • महाराष्ट्र
  • मुंबईतील पागडी प्रणालीतील जिर्ण इमारतींच्या पुनर्विकासासाठी आमदार अनिल परब आणि आदित्य ठाकरे यांची mhadaofficial अधिकाऱ्यांसोबत बैठक
Image

मुंबईतील पागडी प्रणालीतील जिर्ण इमारतींच्या पुनर्विकासासाठी आमदार अनिल परब आणि आदित्य ठाकरे यांची mhadaofficial अधिकाऱ्यांसोबत बैठक

मुंबईतील पागडी प्रणाली अंतर्गत येणाऱ्या धोकादायक व जिर्ण इमारतींच्या पुनर्विकास या गंभीर प्रश्नावर आमदार अनिल परब, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे आणि पागडी एकता संघ पदाधिकाऱ्यांनी एमएचएडीएचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुभाष जाधव (IAS) यांची भेट घेतली.

सध्या मुंबईत जवळपास 13,800 हून अधिक इमारतींमध्ये सुमारे 10 लाख कुटुंबं गेली 70 वर्षांपासून वास्तव्यास आहेत. या इमारतींपैकी बहुतांश इमारती जिर्णावस्थेत असून राहण्यासाठी धोकादायक ठरल्या आहेत.

मविआ सरकारच्या काळात भाडेकरूंना पुनर्विकासाचा अधिकार देण्यासाठी कायद्यात बदल करण्यात आले होते. म्हणजेच, जर मालकाने पुनर्विकासास नकार दिला, तरीही भाडेकरूंना तो करण्याचा अधिकार मिळणार होता. मात्र, सध्या ‘कायदेशीररित्या सक्षम प्राधिकरण/संस्था कोण?’ या कारणावरून ही अंमलबजावणी थांबविण्यात आली आहे.

आजच्या बैठकीत दोन महत्त्वाच्या मागण्या पुढे मांडल्या गेल्या:

  • भाडेकरूंना पुनर्विकासाचा अधिकार देणाऱ्या दुरुस्तीच्या न्यायालयीन प्रकरणांवर तातडीने निकाल देण्यासाठी गती द्यावी.
  • 1965 पूर्वीच्या सर्व सेस इमारतींच्या पुनर्विकासासाठी स्पष्ट निर्देश द्यावेत, जे मालक किंवा भाडेकरू दोघांनाही लागू होतील.

या मागण्यांवर चर्चा करताना मान्यवरांनी तातडीच्या उपाययोजनांवर भर दिला. मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी आणि चांगल्या राहणीमानासाठी पुनर्विकासाची प्रक्रिया लवकर सुरू व्हावी, हीच वेळेची गरज असल्याचं एकमत बैठकीत व्यक्त झालं.

Releated Posts

वाढत्या डिझेल दरवाढीने मच्छिमार आर्थिक अडचणीत;केंद्राकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे,

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई :दि .23 :महाराष्ट्रातील मच्छीमारांना वाढत्या डिझेल दरांमुळे मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असून,…

ByByEditorial मार्च 23, 2026

१७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये २७ ते २० मार्चदरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली…

ByByEditorial मार्च 13, 2026

व्यावसायिक गॅस टंचाईमुळे हॉस्टेल-पीजी, हॉटेल व्यवसाय अडचणीत, अभिनेता हेमंत ढोमे यांची प्रतिक्रिया

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : बाजारात व्यावसायिक गॅसचा पुरवठा ठप्प झाल्यामुळे हॉस्टेल्स, पेइंग गेस्ट (PG) व्यवस्था आणि हॉटेल…

ByByEditorial मार्च 11, 2026

हजारो लोकांना मनसेचे सदस्य व्हायचे; मनसैनिकांनी पुढाकार घ्यावा : राज ठाकरे, मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाची रायगडावरून सुरुवात

विशेष प्रतिनिधी : कोकणधारा रायगड : “आज महाराष्ट्रात हजारो लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सदस्य व्हायचे आहे. फक्त सदस्य…

ByByEditorial मार्च 9, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

रत्नागिरीत एलईडी मासेमारीवर कारवाई; ‘भराडी प्रसन्न’ नौका जप्त
चिपळूणच्या स्वप्ना यादव यांना कोल्हापूरमध्ये ‘बेस्ट सीईओ’ पुरस्कार; सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा गौरव.
खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश; स्थानिक राजकारणात खळबळ
रत्नागिरीला १०० ‘राजमाता जिजाऊ’ बसेस; अधिक सुविधा, आरामदायी प्रवास
मुंबई-विजयदुर्ग रो-रो बोट सेवा बंद; कमी प्रतिसाद आणि महागडे दर कारणीभूत
sangmeshwar-student-harassment-case-accused-arrested-devrukh
chiplun-water-pipeline-burst-repair-nihar-kovale-action
nivli-jaigad-road-trailer-accident-driver-case-filed
निवळी-जयगड मार्गावर १८ चाकी ट्रेलरचा अपघात; चालकावर गुन्हा दाखल