konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” रायगडात सुरू – गावांच्या विकासासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न
Image

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” रायगडात सुरू – गावांच्या विकासासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

रायगड | राज्यभरात १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान राबविण्यात येणाऱ्या “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” अंतर्गत रायगड जिल्ह्यातील जिल्हास्तरीय कार्यशाळा कुरुळ येथे पार पडली.

या कार्यशाळेत जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासातील भूमिकेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामपंचायत म्हणजे राज्य व केंद्र शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे साधन असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

“समृद्ध पंचायतराज अभियान” सात घटकांवर आधारित असून गावांच्या स्वच्छतेसह जलसमृद्धीसाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहनही करण्यात आले. लोकसहभागातून गावांचा विकास साधल्यास सर्व आघाड्यांवर यश मिळवता येईल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, रोहयो मंत्री भरत गोगावले, यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे तसेच जिल्हा परिषदेतील विविध खातेप्रमुख, गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे