konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • बिनविरोध निवडीनंतर आमदार प्रमोद जठार यांचा सिंधुदुर्ग दौरा ठरला ; दोन दिवसांत आठही तालुक्यांमध्ये धडाकेबाज भेटी !
Image

बिनविरोध निवडीनंतर आमदार प्रमोद जठार यांचा सिंधुदुर्ग दौरा ठरला ; दोन दिवसांत आठही तालुक्यांमध्ये धडाकेबाज भेटी !

दोडामार्ग : भूषण सावंत : विधानपरिषद आमदार म्हणून प्रमोद जठार यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर संबंधित आमदारांचा ७ व ८ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दौरा निश्चित झाला असून, या दौऱ्यात ते जिल्ह्यातील आठही तालुक्यांना भेट देत स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत. या दौऱ्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत असून, पक्ष संघटनेला बळकटी देण्याच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

👉 ७ मे रोजीचा दौरा पुढीलप्रमाणे :
सकाळी १० वाजता दोडामार्ग भाजप कार्यालयात भेट, त्यानंतर सकाळी ११:३० वाजता सावंतवाडी येथे पदाधिकाऱ्यांशी संवाद. दुपारी २ वाजता वेंगुर्ला येथे बैठक होणार असून, सायंकाळी ४ वाजता कुडाळ आणि सायंकाळी ६ वाजता मालवण येथे दौऱ्याचा पुढील टप्पा पार पडणार आहे.

👉 ८ मे रोजीचा दौरा :
सकाळी १०:३० वाजता देवगड येथे सुरुवात होऊन, सकाळी ११:३० वाजता पडेल येथे भेट दिली जाणार आहे. दुपारी १ वाजता वैभववाडी येथे कार्यकर्त्यांशी चर्चा होणार असून, सायंकाळी ३:३० वाजता कणकवली ग्रामीण भागात, सायंकाळी ५ वाजता कणकवली शहरात बैठक पार पडेल. दौऱ्याचा समारोप सायंकाळी ६:३० वाजता तळेरे येथे गावकऱ्यांच्या सत्काराने होणार आहे.

⚡ संघटन मजबूत करण्यावर भर
या दौऱ्यात स्थानिक पातळीवरील प्रश्न, संघटनात्मक अडचणी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती यावर सखोल चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करून पक्षाची पकड अधिक मजबूत करण्याचा स्पष्ट प्रयत्न या दौऱ्यातून दिसून येत आहे.

📌 राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला
दोन दिवसांच्या या तुफानी दौऱ्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, विविध ठिकाणी होणाऱ्या बैठका आणि संवादामुळे राजकीय समीकरणांमध्ये हालचाली वेगाने घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Releated Posts

परंपरेचा वारसा, स्त्रीकर्तृत्वाचा गौरव!

भोरगाव लेवा पाटीदार पंचायतच्या वतीने ‘नवदुर्गा सन्मान पुरस्कार २०२६’ सोहळा उत्साहात; विविध क्षेत्रांतील नऊ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान अंबरनाथ…

ByByEditorial नवम्बर 23, 2026

देवगडच्या समुद्रात मध्यरात्री थरार! तासभर पाठलाग करून कर्नाटकची हायस्पीड ट्रॉलर जप्त

सिंधुदुर्ग : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदा मासेमारी करणाऱ्या परराज्यातील नौकांविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागाने पुन्हा एकदा धडक कारवाई केली आहे.…

ByByEditorial नवम्बर 23, 2026

रॅपिडोविरोधात रिक्षाचालकांचा राज्यव्यापी बंद!

मुंबई-पुण्यात संमिश्र प्रतिसाद; कोल्हापुरात हजारो रिक्षाचालक सहभागी, ठाण्यात सेवा सुरळीत मुंबई : अॅपआधारित रॅपिडो बाइक टॅक्सी सेवेमुळे पारंपरिक…

ByBycare.eviano@gmail.com नवम्बर 23, 2026

अलिबागमध्ये नार्वेकर बंधूंची जमीन खरेदी; आदिवासींची घरे पाडल्याचा आरोप!

संजय राऊतांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; म्हात्रोळीतील कातकरी कुटुंबांच्या विस्थापनाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग…

ByBycare.eviano@gmail.com नवम्बर 23, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

परंपरेचा वारसा, स्त्रीकर्तृत्वाचा गौरव!
देवगडच्या समुद्रात मध्यरात्री थरार! तासभर पाठलाग करून कर्नाटकची हायस्पीड ट्रॉलर जप्त
रॅपिडोविरोधात रिक्षाचालकांचा राज्यव्यापी बंद!
अलिबागमध्ये नार्वेकर बंधूंची जमीन खरेदी; आदिवासींची घरे पाडल्याचा आरोप!
अखिलेश यादव यांचे फेसबुक पेज दीड तास गायब!
शिरसाटांच्या गौप्यस्फोटावर शिंदेंची सावध प्रतिक्रिया!
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक बदल होणार?
रोहित पवारांच्या आंदोलनाला पक्षाचा पाठिंबा!
एनव्हिडियाच्या नेतृत्वात पुन्हा जेनसन हुआंग!