konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • धोक्याची घंटा! मिरजोळी येथील ब्रिटिशकालीन पूल मोजतोय शेवटची घटका : रहिमान दलवाई
प्रतिनिधी : कोकणधारा

धोक्याची घंटा! मिरजोळी येथील ब्रिटिशकालीन पूल मोजतोय शेवटची घटका : रहिमान दलवाई

प्रतिनिधी : कोकणधारा

चिपळूण : चिपळूण–गुहागर मार्गावरील मिरजोळी येथील ब्रिटिशकालीन पूल सध्या अतिशय जीर्ण अवस्थेत असून, तो अक्षरशः शेवटच्या घटका मोजत असल्याचे चित्र समोर आले आहे. या पुलावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असतानाच त्याची दयनीय अवस्था नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण करण्याची शक्यता सामाजिक कार्यकर्ते रहिमान दलवाई यांनी व्यक्त केली आहे.

गुहागर–विजापूर हा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा मार्ग असून, या मार्गावरील मिरजोळी येथील पूल ब्रिटिश काळात बांधण्यात आला होता. अनेक दशकांपासून हा पूल वाहतुकीचा मुख्य आधार राहिला आहे. मात्र, कालांतराने देखभालीअभावी पुलाची रचना कमकुवत झाली असून, सध्या तो धोकादायक स्थितीत पोहोचला आहे. या मार्गावरून दररोज टँकर, डंपर, ट्रक, एसटी बस तसेच लहान-मोठी वाहने मोठ्या प्रमाणावर ये-जा करत असतात. वाढत्या वाहतुकीच्या ताणामुळे पुलाची झीज अधिकच वाढली आहे. पुलावरून जाताना वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे.

स्थानिक सामाजिक कार्यकर्ते रहिमान दलवाई यांनी या गंभीर समस्येकडे शासनाचे लक्ष वेधले आहे.“पुलाची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. कोणतीही मोठी दुर्घटना घडण्याआधीच प्रशासनाने तातडीने दखल घेऊन दुरुस्ती किंवा नव्याने पूल उभारण्याची गरज आहे,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
स्थानिक नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले असून, संभाव्य दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने वेळेत पावले उचलली नाहीत, तर मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Releated Posts

स्वप्ना यादव यांचा ‘बेस्ट सीईओ’ पुरस्काराने सन्मान, कोल्हापूरमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव; सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल

प्रतिनिधी : कोकणधारा कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या. आयोजित सहकारी पतसंस्थांचा महिला मेळावा शुक्रवारी (ता.…

ByByEditorial अप्रैल 5, 2026

खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश करणार; स्थानिक राजकारणात खळबळ

खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश करणार; स्थानिक राजकारणात खळबळ खेर्डी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे स्थानिक पातळीवरील…

ByByEditorial अप्रैल 5, 2026

“रत्नागिरीला १०० ‘राजमाता जिजाऊ’ बसेससीसीटीव्ही, अधिक आसन क्षमता; प्रवास होणार आरामदायी”

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : जिल्ह्यासह राज्यभरातील प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला…

ByByEditorial अप्रैल 5, 2026

मोठ्या गाजावाजात सुरू झालेली मुंबई विजयदुर्ग रो रो बोट सेवा बंद

प्रतिनिधी : कोकणधारा कोकणासाठी मोठ्या आशेचा किरण ठरलेली मुंबई-विजयदुर्ग रो-रो बोट सेवा आता अचानक ठप्प झाली आहे.गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर…

ByByEditorial अप्रैल 5, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

चिपळूणच्या स्वप्ना यादव यांना कोल्हापूरमध्ये ‘बेस्ट सीईओ’ पुरस्कार; सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा गौरव.
खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश; स्थानिक राजकारणात खळबळ
रत्नागिरीला १०० ‘राजमाता जिजाऊ’ बसेस; अधिक सुविधा, आरामदायी प्रवास
मुंबई-विजयदुर्ग रो-रो बोट सेवा बंद; कमी प्रतिसाद आणि महागडे दर कारणीभूत
sangmeshwar-student-harassment-case-accused-arrested-devrukh
chiplun-water-pipeline-burst-repair-nihar-kovale-action
nivli-jaigad-road-trailer-accident-driver-case-filed
निवळी-जयगड मार्गावर १८ चाकी ट्रेलरचा अपघात; चालकावर गुन्हा दाखल
परशुराम घाटात भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी