konkandhara.com

  • Home
  • महाराष्ट्र
  • मेट्रो मार्ग 4 व 4अ: ठाणे-मुंबईकरांसाठी वेळ आणि ऊर्जा वाचवणारा विकासमार्ग!
Image

मेट्रो मार्ग 4 व 4अ: ठाणे-मुंबईकरांसाठी वेळ आणि ऊर्जा वाचवणारा विकासमार्ग!

ठाणे – ठाणे आणि मुंबईकरांसाठी बहुप्रतीक्षित मेट्रो मार्ग 4 व 4अचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत एमएमआरडीएकडून गायमुख ते विजय गार्डन स्टेशनदरम्यान मेट्रोची तांत्रिक तपासणी व चाचणी यशस्वीरीत्या पार पडली.

👉 प्रकल्पाची वैशिष्ट्ये :

  • मेट्रो मार्ग 4 (32.32 किमी) व 4अ (2.88 किमी), एकूण लांबी 35.20 किमी
  • 8 डब्यांची मेट्रो, एकूण 32 स्थानके
  • अंदाजे ₹16,000 कोटी खर्च
  • दररोज सुमारे 13.43 लाख प्रवासी प्रवास करतील
  • मोगरपाडा येथे 45 हेक्टर जागेवर डेपो, ज्यातून मेट्रो 4, 4अ, 10 व 11 चे व्यवस्थापन
  • पूर्व व पश्चिम उपनगरांना ठाणे आणि मुंबईशी जोडणारा प्रकल्प
  • वडाळा ते सीएसएमटी जोडणाऱ्या मेट्रो 11 शी मिळालेली जोडणी झाल्यावर देशातील सर्वात लांब 58 किमी कॉरिडॉर
  • प्रवासाचा वेळ 50–75% कमी, रस्त्यांवरील ताण घटणार

मुख्यमंत्री फडणवीस यांनी एमएमआरडीएच्या प्रयत्नांचे कौतुक करत काम अधिक वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. ठाणेकर व मुंबईकरांना या सोयीचा लवकरात लवकर लाभ मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

image 5

तसेच त्यांनी सांगितले की, ठाणे रिंग मेट्रोला केंद्र सरकारची मान्यता मिळाली असून हा प्रकल्प देखील भविष्यातील वाहतूक सोयीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Releated Posts

परंपरेचा वारसा, स्त्रीकर्तृत्वाचा गौरव!

भोरगाव लेवा पाटीदार पंचायतच्या वतीने ‘नवदुर्गा सन्मान पुरस्कार २०२६’ सोहळा उत्साहात; विविध क्षेत्रांतील नऊ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान अंबरनाथ…

ByByEditorial नवम्बर 23, 2026

देवगडच्या समुद्रात मध्यरात्री थरार! तासभर पाठलाग करून कर्नाटकची हायस्पीड ट्रॉलर जप्त

सिंधुदुर्ग : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदा मासेमारी करणाऱ्या परराज्यातील नौकांविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागाने पुन्हा एकदा धडक कारवाई केली आहे.…

ByByEditorial नवम्बर 23, 2026

रॅपिडोविरोधात रिक्षाचालकांचा राज्यव्यापी बंद!

मुंबई-पुण्यात संमिश्र प्रतिसाद; कोल्हापुरात हजारो रिक्षाचालक सहभागी, ठाण्यात सेवा सुरळीत मुंबई : अॅपआधारित रॅपिडो बाइक टॅक्सी सेवेमुळे पारंपरिक…

ByBycare.eviano@gmail.com नवम्बर 23, 2026

अलिबागमध्ये नार्वेकर बंधूंची जमीन खरेदी; आदिवासींची घरे पाडल्याचा आरोप!

संजय राऊतांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; म्हात्रोळीतील कातकरी कुटुंबांच्या विस्थापनाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग…

ByBycare.eviano@gmail.com नवम्बर 23, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

परंपरेचा वारसा, स्त्रीकर्तृत्वाचा गौरव!
देवगडच्या समुद्रात मध्यरात्री थरार! तासभर पाठलाग करून कर्नाटकची हायस्पीड ट्रॉलर जप्त
रॅपिडोविरोधात रिक्षाचालकांचा राज्यव्यापी बंद!
अलिबागमध्ये नार्वेकर बंधूंची जमीन खरेदी; आदिवासींची घरे पाडल्याचा आरोप!
अखिलेश यादव यांचे फेसबुक पेज दीड तास गायब!
शिरसाटांच्या गौप्यस्फोटावर शिंदेंची सावध प्रतिक्रिया!
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक बदल होणार?
रोहित पवारांच्या आंदोलनाला पक्षाचा पाठिंबा!
एनव्हिडियाच्या नेतृत्वात पुन्हा जेनसन हुआंग!