konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानात सर्वांनी सहभागी व्हाआमदार भास्कर जाधव यांचे आवाहन
‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानात सहभागी व्हा – आमदार भास्कर जाधव

‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानात सर्वांनी सहभागी व्हाआमदार भास्कर जाधव यांचे आवाहन

चिपळूण : ‘माझं गाव आरोग्य संपन्न असले पाहिजे, ही भावना प्रत्येकाच्या मनात असावी. आरोग्यविषयक तक्रारींवर योग्य उपाय जाणून घेऊन शेवटच्या घटकापर्यंत जनजागृती पोहोचली पाहिजे. गाव ते राज्य पातळीपर्यंत सर्वांनी या मोहिमेत मिशन म्हणून सहभागी व्हावे,’ असे आवाहन गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव यांनी केले.

चिपळूण पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शुक्रवारी सकाळी ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत आरोग्य अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या वेळी जिल्हा परिषद सदस्य पूजा निकम, संजय कदम, दीप्ती महाडिक, पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत खेतले, उपसभापती बापू आयरे, सदस्य शौकत माखजनकर, विनोद झगडे, तसेच तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमात डॉ. अजय सानप व डॉ. ज्योती यादव यांनी आरोग्यविषयक विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. आमदार जाधव यांनी सांगितले की, या मोहिमेत सहभागी होणाऱ्या व उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत, त्यामुळे सर्व गावांनी उत्साहाने सहभाग घ्यावा. तसेच मुलींमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या एचपीव्ही लसीबाबत जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले. ही लस अधिकाधिक मुलींनी घ्यावी, यासाठी लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवावी, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरोग्य पर्यवेक्षक आर. के. पवार, नारायण शिंगवा, मनोहर तायडे, विनायक हेगडे, काका चव्हाण, आरोग्य सहाय्यक एस. वाय. जानवलकर आदींनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन इकबाल चौगुले यांनी केले.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे