konkandhara.com

मांडकीतील ग्रामस्थांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश चिपळूण : तालुक्यातील मांडकी गावातील असंख्य ग्रामस्थांनी सोमवारी (ता. १३) सायंकाळी मोठ्या उत्साहात भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. यावेळी ग्रामस्थांनी स्थानिक विकासाच्या नव्या अपेक्षा व्यक्त करत, परिवर्तनाच्या दिशेने हे पाऊल टाकल्याचा विश्वास व्यक्त केला. “भाजप हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा पक्ष असून ‘राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः’ या मूल्यांवर चालणाऱ्या या मोठ्या राजकीय कुटुंबाचा आपण भाग झाला आहात. गावाच्या विकासासाठी कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही,” अशी ग्वाही प्रशांत यादव यांनी दिली. खेर्डी येथील स्वामिनी निवासस्थानी झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यास जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल पवार, जिल्हा चिटणीस योगेश शिर्के, विशेष निमंत्रित सदस्य सौ. स्वप्ना यादव, तसेच सामाजिक कार्यकर्ते रमण डांगे, प्रशांत वाजे, अविनाश गुडेकर, महेश खेतले आदी उपस्थित होते. यावेळी मांडकी गावातील अनेक ग्रामस्थांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कार्यक्रमादरम्यान “भारत माता की जय” आणि “भारतीय जनता पार्टीचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. दरम्यान, प्रशांत यादव यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या. ग्रामस्थांची एकजूट कायम ठेवावी, तसेच त्यांच्या पाठीशी भाजप आणि स्वतः पूर्ण ताकदीने उभे राहतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

मांडकीतील ग्रामस्थांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

चिपळूण : तालुक्यातील मांडकी गावातील असंख्य ग्रामस्थांनी सोमवारी (ता. १३) सायंकाळी मोठ्या उत्साहात भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.

यावेळी ग्रामस्थांनी स्थानिक विकासाच्या नव्या अपेक्षा व्यक्त करत, परिवर्तनाच्या दिशेने हे पाऊल टाकल्याचा विश्वास व्यक्त केला. “भाजप हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा पक्ष असून ‘राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः’ या मूल्यांवर चालणाऱ्या या मोठ्या राजकीय कुटुंबाचा आपण भाग झाला आहात. गावाच्या विकासासाठी कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही,” अशी ग्वाही प्रशांत यादव यांनी दिली.

खेर्डी येथील स्वामिनी निवासस्थानी झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यास जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल पवार, जिल्हा चिटणीस योगेश शिर्के, विशेष निमंत्रित सदस्य सौ. स्वप्ना यादव, तसेच सामाजिक कार्यकर्ते रमण डांगे, प्रशांत वाजे, अविनाश गुडेकर, महेश खेतले आदी उपस्थित होते.

यावेळी मांडकी गावातील अनेक ग्रामस्थांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कार्यक्रमादरम्यान “भारत माता की जय” आणि “भारतीय जनता पार्टीचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

दरम्यान, प्रशांत यादव यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या. ग्रामस्थांची एकजूट कायम ठेवावी, तसेच त्यांच्या पाठीशी भाजप आणि स्वतः पूर्ण ताकदीने उभे राहतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे