konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • महिला दिनानिमित्त चिपळूणमध्ये ‘आरोही – सायबर सुरक्षित नारी, डिजिटल सक्षम नारी’ कार्यक्रम
mahila-din-arohi-cyber-surakshit-nari-program-chiplun

महिला दिनानिमित्त चिपळूणमध्ये ‘आरोही – सायबर सुरक्षित नारी, डिजिटल सक्षम नारी’ कार्यक्रम

विशेष प्रतिनिधी, कोकणधारा

चिपळूण : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षिततेसह डिजिटल सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन – WDW महाराष्ट्र आणि रत्नागिरी जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने “आरोही – सायबर सुरक्षित नारी, डिजिटल सक्षम नारी” हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सध्याच्या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून महिलांनी ऑनलाइन फसवणूक, आर्थिक गुन्हे तसेच सोशल मीडियाशी संबंधित धोके याबाबत सजग राहणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर महिलांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या कार्यक्रमात सायबर सुरक्षा जनजागृतीपर व्याख्यान, सायबर तज्ज्ञ, पोलीस अधिकारी, डॉक्टर, वकील आणि पत्रकार यांच्या सहभागातून पॅनेल डिस्कशन होणार आहे. तसेच IMA WDW महाराष्ट्र महिला डॉक्टर हेल्पलाईनचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

याशिवाय समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना “आरोही नारी गौरव पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमात “छावा” हे विशेष आकर्षण तसेच ‘डिजिटल जागर’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचाही समावेश आहे.

हा कार्यक्रम दि. १२ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, मार्कंडी (चिपळूण) येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे