konkandhara.com

  • Home
  • राजकारण
  • महाडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व; जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही ताब्यात
mahad election

महाडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व; जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही ताब्यात

महाड | कोंकणधारा डेस्क:
महाड तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या मतमोजणीत शिवसेना (एकनाथ शिंदे गट) ने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. जिल्हा परिषदेच्या पाचही गटांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले, तर पंचायत समितीच्या दहा पैकी नऊ जागांवर या गटाने विजय मिळवला आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट झाले. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी अनेक ठिकाणी पराभव मान्य करत मतमोजणी केंद्रातून निघून जाणे पसंत केले.

जिल्हा परिषद गटांचे निकाल

महाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच गटांमध्ये खालील उमेदवार विजयी ठरले—

  • बिरवाडी जि.प. गट: मंदा भागोजी ढेबे
  • खरवली जि.प. गट: मनाली मनोज काळीजकर
  • नडगाव तर्फे बिरवाडी जि.प. गट: विकास भरत गोगावले
  • दासगाव जि.प. गट: मन्सूर अ. हमीद ताज
  • करंजाडी जि.प. गट: निलेश लक्ष्मण ताठरे

या निकालांमुळे जिल्हा परिषदेवर शिवसेना शिंदे गटाची पकड अधिक मजबूत झाली आहे.

पंचायत समितीवर नऊ जागांवर विजय

पंचायत समितीच्या गणांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या खालील उमेदवारांनी विजय मिळवला

  • वरंध गण: नूतन गोपाळ मोरे
  • खरवली गण: दिव्या मनोहर रेशीम
  • नडगाव तर्फे बिरवाडी गण: रेणुका राजेश देशमुख
  • नाते गण: सुरेश शांताराम महाडिक
  • दासगाव गण: प्रेरणा जितेंद्र सावंत
  • करंजाडी गण: संदीप रमेश खिडबडे
  • विन्हेरे गण: शकुंतला श्रीरंग माने
  • अप्पर तुडील गण: सबिया पाचकर

याशिवाय सवाने पंचायत समिती गणातील अनिल जाधव हे उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते.

दरम्यान, बिरवाडी पंचायत समिती गणात मयूर पुंडलिक जाधव यांनी विजय मिळवत राष्ट्रवादी–भाजप आघाडीचे एकमेव खाते उघडले आहे.

चुरशीच्या लढतीत निर्णायक विजय

या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष वेधून घेणाऱ्या लढतींपैकी नडगाव तर्फे बिरवाडी जिल्हा परिषद गट महत्त्वाचा ठरला. येथे राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास भरत गोगावले यांनी तब्बल पाच हजार मतांची आघाडी घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निलेश महाडिक यांचा दारुण पराभव केला.

त्याचप्रमाणे करंजाडी जिल्हा परिषद मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असलेल्या निलेश ताठरे यांनी सतत चर्चेत असलेले सोमनाथ ओझर्डे यांचा पराभव करत विजय संपादन केला.

निवडणूक जिल्हा परिषदेची, गुलाल विधानसभेचा

महाड नगरपालिकेत चांगली कामगिरी केल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी सुनील तटकरे यांनी भाजपसोबत युती करत ताकद लावली होती. मात्र, मजबूत जनसंपर्क असलेल्या मंत्री भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा महाड–पोलादपूर तालुक्यावर आपली पकड कायम असल्याचे दाखवून दिले.

नगरपालिका निवडणुकीनंतर दोन गटांत झालेल्या वादांच्या पार्श्वभूमीवर विकास गोगावले यांचा हा विजय प्रतिष्ठेचा प्रश्न बनला होता. मात्र मोठ्या मताधिक्याने विजय मिळवल्यानंतर महाडमध्ये विधानसभा निवडणुकीप्रमाणे गुलाल उधळण्यात आला.

राष्ट्रवादी बॅकफूटवर; ठाकरे गटाची मते स्थिर

या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर गेल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार स्नेहल माणिकराव जगताप यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र, त्याचा पहिला फटका महाड नगरपालिकेत बसल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही त्यांच्या कुटुंबाची राजकीय ताकद कमी झाल्याचे दिसून आले.

दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मते तुलनेने स्थिर असल्याचे चित्र दिसत असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय मतदारांना पसंत न पडल्याचे या निकालातून स्पष्ट होत आहे.

निष्कर्ष

महाड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गटाने पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. या निकालामुळे महाड–पोलादपूर पट्ट्यातील आगामी स्थानिक व विधानसभा राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लेखक : कोंकणधारा डेस्क

Releated Posts

रत्नागिरीत अनधिकृत एल.ई.डी. मासेमारीवर कारवाई; ‘भराडी प्रसन्न’ नौका मत्स्यव्यवसाय विभागाकडून जप्त

रत्नागिरी: प्रतिनिधी मिरकरवाडा ते गणपतीपुळे दरम्यान नियमित सागरी गस्त घालत असताना मत्स्यव्यवसाय विभागाने अनधिकृत एल.ई.डी. (LED) लाईट लावून…

ByByEditorial अप्रैल 6, 2026

स्वप्ना यादव यांचा ‘बेस्ट सीईओ’ पुरस्काराने सन्मान, कोल्हापूरमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव; सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल

प्रतिनिधी : कोकणधारा कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या. आयोजित सहकारी पतसंस्थांचा महिला मेळावा शुक्रवारी (ता.…

ByByEditorial अप्रैल 5, 2026

खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश करणार; स्थानिक राजकारणात खळबळ

खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश करणार; स्थानिक राजकारणात खळबळ खेर्डी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे स्थानिक पातळीवरील…

ByByEditorial अप्रैल 5, 2026

“रत्नागिरीला १०० ‘राजमाता जिजाऊ’ बसेससीसीटीव्ही, अधिक आसन क्षमता; प्रवास होणार आरामदायी”

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : जिल्ह्यासह राज्यभरातील प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला…

ByByEditorial अप्रैल 5, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

रत्नागिरीत एलईडी मासेमारीवर कारवाई; ‘भराडी प्रसन्न’ नौका जप्त
चिपळूणच्या स्वप्ना यादव यांना कोल्हापूरमध्ये ‘बेस्ट सीईओ’ पुरस्कार; सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा गौरव.
खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश; स्थानिक राजकारणात खळबळ
रत्नागिरीला १०० ‘राजमाता जिजाऊ’ बसेस; अधिक सुविधा, आरामदायी प्रवास
मुंबई-विजयदुर्ग रो-रो बोट सेवा बंद; कमी प्रतिसाद आणि महागडे दर कारणीभूत
sangmeshwar-student-harassment-case-accused-arrested-devrukh
chiplun-water-pipeline-burst-repair-nihar-kovale-action
nivli-jaigad-road-trailer-accident-driver-case-filed
निवळी-जयगड मार्गावर १८ चाकी ट्रेलरचा अपघात; चालकावर गुन्हा दाखल