konkandhara.com

lovale-accident-truck-fell-into-valley-sangameshwar

लोवले येथे भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळला, दोघे जखमी

संगमेश्वर : देवरुख-संगमेश्वर राज्यमार्गावरील लोवले येथे सोमवारी रात्री झालेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली. वळणावर निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे १०.३० ते ११ वाजण्याच्या दरम्यान एमएच ४६ बीएफ ६२१० क्रमांकाचे एलपी वाहन देवरुखहून संगमेश्वरकडे येत होते. त्याचवेळी चिपळूणहून बॉक्साईट भरून आंबाघाटाच्या दिशेने जाणारा एमएच १० सीआर ३४५६ क्रमांकाचा ट्रक समोरून येत होता. लोवले येथील वळणावर एलपी चालकाने वाहन रस्त्याच्या मधोमध आणल्याने दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली.

धडकेनंतर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि बॉक्साईटने भरलेला ट्रक सुमारे पाच ते सहा फूट खोल दरीत कोसळला. अपघाताची तीव्रता इतकी होती की एलपी वाहनाच्या केबिनचा पूर्ण चक्काचूर झाला.

या अपघातात एलपी चालक बालाजी जलबा कोंडेवार (रा. नांदेड) हा केबिनमध्ये अडकून पडला होता. घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मोठ्या प्रयत्नांनंतर त्याला बाहेर काढण्यात आले. या धाडसी बचावकार्यामुळे त्याचे प्राण वाचले.
या अपघातात बालाजी कोंडेवार आणि ट्रक चालक मोहम्मद युसूफ शफी शेख हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी तातडीने पंचनामा करून अपघातग्रस्त वाहने बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, एलपी चालकाच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे