konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • लांजात मंदिराच्या वादातून ६३ वर्षीय वृद्धाला मारहाण; पाच जणांविरोधात गुन्हा
Image

लांजात मंदिराच्या वादातून ६३ वर्षीय वृद्धाला मारहाण; पाच जणांविरोधात गुन्हा

प्रतिनिधी : कोकणधारा

लांजा : मंदिराच्या जागेवरून झालेल्या वादातून ६३ वर्षीय वृद्धाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना लांजा तालुक्यातील भांबेड कुडेवाडी येथे बुधवारी (दि. ११) रात्री सुमारे १०.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी लांजा पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष शामकांत मोरे (वय ६३, रा. भांबेड कुडेवाडी) यांनी लांजा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

भांबेड कुडेवाडी येथे जांगल देवाचे जुने मंदिर असून ते पाडून त्याठिकाणी नवीन मंदिर उभारण्याचा गावकऱ्यांनी निर्णय घेतला होता. त्यानुसार सुभाष मोरे यांनी मंदिराच्या जागी नारळ ठेवला होता. याच कारणावरून गावातील काही व्यक्तींमध्ये वाद निर्माण झाला.
या वादातून श्रीधर शंकर मोरे (वय ८०), तुळशीराम शंकर मोरे (वय ७२), तेजस तुळशीराम मोरे (वय ३५), श्रद्धेश तुळशीराम मोरे उर्फ बारक्या (वय ३२) आणि गणेश जयराम मोरे (वय ५५, सर्व रा. भांबेड कुडेवाडी, ता. लांजा) यांनी बुधवारी रात्री सुभाष मोरे यांच्या घरी जाऊन बेकायदा जमाव करून गोंधळ घातल्याचे तक्रारीत नमूद आहे.

तसेच त्यांनी शिवीगाळ करत हाताच्या थपडा व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत सुभाष मोरे यांच्या उजव्या हाताच्या करंगळीला दुखापत झाली असून त्यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

घटनेनंतर सुभाष मोरे यांनी लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी वरील पाच जणांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १८९(२), १९१(२), १९०, ११५(२), ३५२ व ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश आखाडे करीत आहेत.

Releated Posts

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार

रत्नागिरी : दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. यानिमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध…

ByByEditorial मई 15, 2026

सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी

प्रलंबित वॉटर पाईपलाईन कामावरून आमदार दिपक केसरकर, नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोंसले यांनी कंत्राटदारांना धरले धारेवर सावंतवाडी : भूषण…

ByByEditorial मई 15, 2026

भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरातून २१ हजारांहून अधिक नागरिकांना दिलासा सिंधुदुर्ग : भूषण सावंत : अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना…

ByByEditorial मई 15, 2026

रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे

तालुकास्तरीय कृषी मेळाव्याला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद कोलाड (शरद जाधव ) जिल्ह्यातील काही तालुक्यांत कृषी मिळावे आयोजीत झाले, त्यातील…

ByByEditorial मई 15, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे
वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू.
रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
‘माझ्या माहेरच्या साडी’च्या मानकरी ठरल्या कमल नाईक
लोकशाहीचा गळा घोटणारे राजभवन | संघराज्य रचनेसमोरील मोठे आव्हान