konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • माणगावात जि.प. ४ जागांसाठी १७, पं.स. ८ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात
Image

माणगावात जि.प. ४ जागांसाठी १७, पं.स. ८ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात

जहेंद्र हरिभाऊ मुंढे
माणगाव तालुका प्रतिनिधी | कोंकणधारा

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज अंतिम मुदत होती. या प्रक्रियेनंतर माणगाव तालुक्यातील निवडणूक चित्र स्पष्ट झाले असून, जिल्हा परिषदेसाठी ४ जागांवर एकूण १७ उमेदवार, तर पंचायत समितीसाठी ८ जागांवर २६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांमध्येही चुरशीची लढत होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसून येत आहेत.

माणगाव तालुक्यात ४५ निजामपूर, ४६ तळाशेत, ४७ मोर्बा आणि ४८ गोरेगाव असे चार जिल्हा परिषद गट आहेत. तर पंचायत समितीमध्ये ८९ पाटणूस ते ९६ लोणेरे असे एकूण आठ गण आहेत. प्रत्येक गट व गणात वेगवेगळ्या राजकीय समीकरणांमुळे प्रचाराला आता वेग येणार आहे.

जिल्हा परिषद गटनिहाय उमेदवार
🔹 ४५ निजामपूर गट

अविनाश अनिल नलावडे – शिवसेना
जनार्दन सुदाम मानकर – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
साबळे राजीव अशोक – राष्ट्रवादी काँग्रेस
दत्ता काशीराम गोरेगावकर – अपक्ष
संजय अर्जुन धाग – अपक्ष
राजू मोहन रोडेकर उर्फ सुतार – अपक्ष

या गटात सहा उमेदवार रिंगणात असून शिवसेना (दोन्ही गट) विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट राजकीय लढत, तर अपक्षांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

🔹 ४६ तळाशेत गट

दिशा दिपक जाधव – राष्ट्रवादी काँग्रेस
स्वाती अनिल नवगणे – शिवसेना
भारती विलासराव सुर्वे – काँग्रेस
रिया राजू रोडेकर उर्फ सुतार – अपक्ष
तळाशेत गटात चार उमेदवार असून येथे राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात त्रिकोणी लढत पाहायला मिळणार आहे.

🔹 ४७ मोर्बा गट

आरिफ सुलेमान मणेर – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
रमेश पांडुरंग मोरे – शिवसेना
अस्लम इब्राहिम राऊत – राष्ट्रवादी काँग्रेस

मोर्बा गटात तीन प्रमुख पक्षांचे उमेदवार असून ही लढत अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

🔹 ४८ गोरेगाव गट

नरेश रामा अहिरे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
भारत विष्णु गोरेगावकर – राष्ट्रवादी काँग्रेस
दिनेश जनार्दन हरवंडकर – शिवसेना
भूषण संघरत्न जाधव – अपक्ष

गोरेगाव गटात चार उमेदवार रिंगणात असून शिवसेनेचे दोन गट समोरासमोर असल्याने ही लढत विशेष लक्षवेधी ठरणार आहे.

🏘️ पंचायत समिती गणनिहाय उमेदवार
🔹 ८९ पाटणूस

संजोग एकनाथ मानकर – राष्ट्रवादी काँग्रेस
विलास यशवंत शिंदे – शिवसेना

🔹 ९० निजामपूर

अक्षय कृष्णा जाधव – शिवसेना
गणेश सोनू पवार – राष्ट्रवादी काँग्रेस
प्रशांत पांडुरंग हिलम – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

🔹 ९१ तळाशेत

उभारे विद्या विपुल – शिवसेना
मनिषा संदेश मालोरे – राष्ट्रवादी काँग्रेस

🔹 ९२ साई

संगिता संजय बक्कम – राष्ट्रवादी काँग्रेस
निष्ठा नंदुराज वाढवळ – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
रचना निलेश थोरे – अपक्ष
बक्कम संगीता अमित – अपक्ष

🔹 ९३ वडवली

खिडविडे सचिन तुकाराम – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
पदरत ज्ञानदेव मारुती – शिवसेना
प्रकाश सखाराम लाड – राष्ट्रवादी काँग्रेस
महेश देवदास सावडेकर – मनसे

🔹 ९४ मोर्बा

अल्का सुभाष केकाणे – राष्ट्रवादी काँग्रेस
पल्लवी विजय मोरे – शिवसेना

🔹 ९५ गोरेगाव

स्वाती अरुण करकरे – शिवसेना
वैदही विनोद बागडे – राष्ट्रवादी काँग्रेस
अक्षता युवराज मुंढे – भाजप
हर्षदा चंद्रकांत सत्वे – अपक्ष

🔹 ९६ लोणेरे

प्रदीप प्रकाश जाधव – काँग्रेस
रवींद्र महादेव टेंबे – शिवसेना
शिवाजी चंद्रकांत टेंबे – राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाकर रामचंद्र ढेपे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

सिताराम पांडुरंग उभारे – अपक्ष

राजकीय हालचालींना वेग

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता माणगाव तालुक्यात निवडणूक प्रचाराला वेग येणार आहे. प्रमुख राजकीय पक्षांनी प्रचार यंत्रणा सज्ज केली असून, स्थानिक प्रश्न, विकासकामे, पाणी, रस्ते, रोजगार आणि सामाजिक योजनांवर आधारित प्रचार रंगणार असल्याचे चित्र आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर माणगाव तालुक्यातील लढती अत्यंत चुरशीच्या ठरणार आहेत. पक्षीय लढतींसोबतच अपक्ष उमेदवारांची भूमिका काही गटांत निर्णायक ठरू शकते. येत्या काही दिवसांत प्रचाराचा ताप वाढत जाणार असून, मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने झुकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे