konkandhara.com

चिपळूणमध्ये शिवसेना महिला आघाडीतर्फे महिला दिनानिमित्त ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. स्वप्नाली बांदेकर, श्रुती बागडे व मधुरा नवरत पैठणीच्या मानकरी ठरल्या.

शिवसेना महिला आघाडीचा ‘खेळ पैठणीचा’ उत्साहात | चिपळूण

प्रतिनिधी : कोकणधारा

चिपळूण : शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्याने रविवारी सायंकाळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या माऊली संपर्क कार्यालयात ‘खेळ पैठणीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला चिपळूण शहरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमात स्वप्नाली बांदेकर, श्रुती बागडे आणि मधुरा नवरत या पैठणीच्या मानकरी ठरल्या.
कार्यक्रमाची सुरुवात हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

यावेळी उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख रश्मीताई गोखले, तालुकाप्रमुख सुप्रियाताई सुर्वे, शहरप्रमुख प्राजक्ता टकले, सुकन्या चव्हाण, शिक्षण व क्रीडा समिती सभापती हर्षाली पवार, महिला व बालकल्याण समिती सभापती रसिका देवळेकर, नगरसेविका वैशाली निमकर, अंजली कदम, वैशाली कदम, पंचायत समितीच्या माजी सभापती व जिल्हा परिषद सदस्या पूजाताई निकम, आरतीताई सकपाळ, महिला बालकल्याण समितीच्या उपाध्यक्षा राणी महाडिक, नगरसेविका नीलम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

‘खेळ पैठणीचा’ या खेळाचे सूत्रसंचालन योगेश बांडागळे यांनी केले. कार्यक्रमादरम्यान प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये ऐश्वर्या लांडे, प्रतिभा खोत, निकिता शिंदे, विद्या नरळकर, पूनम भोजने यांना विशेष बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

ज्येष्ठ महिलांसाठी घेण्यात आलेल्या खेळांमध्ये मनीषा पाटील प्रथम, अनुसया पानकर द्वितीय, तर अमिता नवरत तृतीय ठरल्या. तसेच खेळादरम्यान काढण्यात आलेल्या लकी ड्रॉमध्ये गीता कदम, मनीषा नवरत आणि राखी कमलाकर या भाग्यवान ठरल्या. विजेत्या तीन महिलांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगीता ठोंबरे, विशाखा उत्तेकर, तेजू साटम, दिशा किंजलकर, प्रिया शिंदे, अनामिका हरदारे, अपर्णा पवार, गायत्री जोशी, स्मिता खंदारे, वंदना पाटील, प्रतीक्षा हरवडे, रिया कांबळी, स्नेहा मोरे, अर्चना कारेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. सुमारे तीन तास चाललेल्या या ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रमाने उपस्थित महिलांचे चांगलेच मनोरंजन केले.

Releated Posts

स्वप्ना यादव यांचा ‘बेस्ट सीईओ’ पुरस्काराने सन्मान, कोल्हापूरमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव; सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल

प्रतिनिधी : कोकणधारा कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या. आयोजित सहकारी पतसंस्थांचा महिला मेळावा शुक्रवारी (ता.…

ByByEditorial अप्रैल 5, 2026

खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश करणार; स्थानिक राजकारणात खळबळ

खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश करणार; स्थानिक राजकारणात खळबळ खेर्डी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे स्थानिक पातळीवरील…

ByByEditorial अप्रैल 5, 2026

“रत्नागिरीला १०० ‘राजमाता जिजाऊ’ बसेससीसीटीव्ही, अधिक आसन क्षमता; प्रवास होणार आरामदायी”

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : जिल्ह्यासह राज्यभरातील प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला…

ByByEditorial अप्रैल 5, 2026

मोठ्या गाजावाजात सुरू झालेली मुंबई विजयदुर्ग रो रो बोट सेवा बंद

प्रतिनिधी : कोकणधारा कोकणासाठी मोठ्या आशेचा किरण ठरलेली मुंबई-विजयदुर्ग रो-रो बोट सेवा आता अचानक ठप्प झाली आहे.गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर…

ByByEditorial अप्रैल 5, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

चिपळूणच्या स्वप्ना यादव यांना कोल्हापूरमध्ये ‘बेस्ट सीईओ’ पुरस्कार; सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा गौरव.
खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश; स्थानिक राजकारणात खळबळ
रत्नागिरीला १०० ‘राजमाता जिजाऊ’ बसेस; अधिक सुविधा, आरामदायी प्रवास
मुंबई-विजयदुर्ग रो-रो बोट सेवा बंद; कमी प्रतिसाद आणि महागडे दर कारणीभूत
sangmeshwar-student-harassment-case-accused-arrested-devrukh
chiplun-water-pipeline-burst-repair-nihar-kovale-action
nivli-jaigad-road-trailer-accident-driver-case-filed
निवळी-जयगड मार्गावर १८ चाकी ट्रेलरचा अपघात; चालकावर गुन्हा दाखल
परशुराम घाटात भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी