konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • खेडमध्ये कुकरची वाफ लागून १३ वर्षीय मुलगी भाजली; रत्नागिरीत उपचार सुरू
खेडमध्ये कुकरची वाफ लागून १३ वर्षीय मुलगी भाजली; रत्नागिरीत उपचार सुरू

खेडमध्ये कुकरची वाफ लागून १३ वर्षीय मुलगी भाजली; रत्नागिरीत उपचार सुरू

प्रतिनिधी : कोकणधारा

खेड : घरगुती काम करताना झालेल्या निष्काळजीपणामुळे खेड येथे १३ वर्षीय मुलगी गंभीररीत्या भाजल्याची घटना घडली आहे. वर्षा सोमनाथ जाधव (वय १३, रा. भरणे नाका, खेड) असे जखमी मुलीचे नाव असून तिच्यावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार दि. १२ मार्च रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. भूक लागल्याने वर्षाने गॅसवर शिजवून ठेवलेल्या भाजीचा कुकर स्वतः उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र कुकरमधील वाफ पूर्णपणे निघाली नसताना झाकण उघडल्याने गरम वाफेचा झोत तिच्या अंगावर आला.

या प्रकारात वर्षाचा चेहरा, छाती व पोटाचा भाग गंभीररीत्या भाजला असून त्वचेवर फोड आले आहेत. घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने तिला कळंबणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असल्याने १९ मार्च रोजी पुढील उपचारासाठी तिला रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.
दरम्यान, या घटनेची नोंद जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीत करण्यात आली आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे