konkandhara.com

khanoli-dashavatari-natya-mahotsav-vengurla

खानोलीत रंगणार पौराणिक नाट्य महोत्सव

दिनांक २१ एप्रिल ते २७ एप्रिल पर्यंत संपन्न होणार

वेंगुर्ला : प्रतिनिधी
Vengurla तालुक्यातील खानोली गावच्या वतीने श्री देव रवळनाथ रंगमंचावर दशावतार कलाक्षेत्रातील आघाडीच्या नाट्य मंडळांचा पौराणिक नाट्य महोत्सव २१ एप्रिल ते २७ एप्रिल या कालावधीत संपन्न होणार आहे.

कोकणची पारंपरिक लोककला असलेल्या दशावताराचा वारसा जपत कलेला नवे व्यासपीठ देणारा हा महोत्सव २१ एप्रिल रोजी उद्घाटनाने सुरू होणार आहे.

या महोत्सवात सागरेश्वर दशावतार नाट्य मंडळ आवेरे, दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळ सिंधुदुर्ग, आजगांवकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ, मोचेमाडकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ मोचेमाड, चेंदवणकर गोरे पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ, आरोलकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ आरवली आणि समारोपाच्या दिवशी खानोलकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ खानोली सादरीकरण करणार आहेत.

या निमित्ताने भव्य लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले असून सात दिवस चालणाऱ्या या महोत्सवाच्या समारोपीय दिवशी भाग्यवान विजेत्यांना बक्षिसे देण्यात येणार आहेत.

उद्घाटन सोहळ्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व विशाल प्रभाकर परब, रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनिलजी (बंधू साहेब) मयेकर यांच्यासह सौ. वेदिका विशाल परब, राकेश धर्णे, प्रसन्ना (बाळू) देसाई, राजन गिरप, सुहास गवंडळकर, अवी (दत्ताराम) दुतोंडकर, विजय नाईक, भालचंद्र केळुसकर, जेष्ठ रंगकर्मी संतोष रेडकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या पौराणिक नाट्य महोत्सवासाठी नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खानोली गावचे सरपंच सुभाष खानोलकर आणि ग्रामस्थांनी केले आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे