konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • कासारकोळवण गावासाठी साडेसहा कोटींच्या पुलास मंजुरी; ४०-४५ वर्षांची प्रतीक्षा संपली
कासारकोळवण पुलास ६.५० कोटींची मंजुरी; ४५ वर्षांची प्रतीक्षा संपली

कासारकोळवण गावासाठी साडेसहा कोटींच्या पुलास मंजुरी; ४०-४५ वर्षांची प्रतीक्षा संपली

सावर्डे : चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील कासारकोळवण गावासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय घेत आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नातून सुमारे ६.५० कोटी रुपयांच्या पुलास मंजुरी मिळाली आहे. गेल्या चार ते पाच दशकांपासून प्रलंबित असलेली ग्रामस्थांची मागणी अखेर पूर्ण झाल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे.

कासारकोळवण गावाच्या दळणवळणासाठी पूल अत्यावश्यक होता. विशेषतः पावसाळ्यात नदीला पूर आल्यामुळे गावाचा संपर्क तुटत असे. त्यामुळे शालेय विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण तसेच नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.
या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांनी विधिमंडळात प्रश्न मांडत तसेच CRF (Central Road Fund) अंतर्गत निधीसाठी सातत्याने पाठपुरावा करून संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि अखेर पुलाच्या कामास मंजुरी मिळवली.

या निर्णयाची माहिती मिळताच कासारकोळवण गावातील ग्रामस्थांनी सावर्डे येथील जनसंपर्क कार्यालयात भेट देऊन आमदार निकम यांचे अभिनंदन केले व आभार मानले. यावेळी सरपंच सौ. मानसी करंबेळे, उपसरपंच प्रकाश तोरस्कर, पोलीस पाटील महेंद्र करंबेळे, तंटामुक्ती अध्यक्ष नथुराम करंबेळे, राजाराम तोरस्कर (गुरुजी), सुहास मांगले (माजी ग्रामपंचायत सदस्य), उल्हास मांगले, सोन्या मांगले, बाळकृष्ण तोरस्कर, रोशन कदम, प्रशांत करंबेळे, सदानंद करंबेळे (ग्रामपंचायत सदस्य) तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

ग्रामस्थांनी भावना व्यक्त करत हा पूल गावाच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे सांगितले. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांचे मनापासून आभार मानले.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे