konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • चारही बाजूंनी पाणी असलेल्या पाणखोल जुवा बेटावर पोहचले महसूल प्रशासन स्व-गणनेत गावाने घडवला आदर्श !
Image

चारही बाजूंनी पाणी असलेल्या पाणखोल जुवा बेटावर पोहचले महसूल प्रशासन स्व-गणनेत गावाने घडवला आदर्श !

सर्व कुटुंबांची स्व-गणना पूर्ण; महसूल यंत्रणा आणि ग्रामस्थांच्या एकजुटीतून मोहिमेला अभूतपूर्व यश

सिंधुदुर्ग : भूषण सावंत चारही बाजूंनी पाण्याने वेढलेल्या आणि भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरणाऱ्या मालवण तालुक्यातील जुवा पाणखोल गावाने स्व-गणना मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करत प्रशासनासमोर आदर्श निर्माण केला आहे. विशेष म्हणजे, बेटासारख्या दुर्गम भागात प्रत्यक्ष पोहोचून महसूल प्रशासनाने ग्रामस्थांच्या सहकार्याने गावातील सर्व कुटुंबांची स्व-गणना यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. महसूल यंत्रणा आणि ग्रामस्थ यांच्या समन्वयातून हे प्रेरणादायी यश साकार झाले आहे.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात स्व-गणना मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत नागरिकांनी स्वतःहून डिजिटल माध्यमातून आपली माहिती ऑनलाइन नोंदवावी, यासाठी व्यापक जनजागृती करण्यात आली. जुवा गावातील ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोहिमेला सकारात्मक साथ दिली.
जुवा गावात एकूण २७ घरे असून ३२ कुटुंबे वास्तव्यास आहेत. गावाची एकूण लोकसंख्या ११९ इतकी आहे. या सर्व कुटुंबांनी स्व-गणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवत तालुक्यासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे यांनी मोहिमेचे नियोजन काटेकोरपणे करत प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात प्रभावी समन्वय साधला. बेटावरील नागरिकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून त्यांना स्व-गणनेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि मदतही उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये विश्वास निर्माण झाला आणि संपूर्ण गावाने निर्धारित कालावधीत स्व-गणना पूर्ण केली.

शासनाच्या निर्देशानुसार दि. १ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांना स्वतःची माहिती स्वतः ऑनलाइन नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांना ही माहिती se.census.gov.in या संकेतस्थळावर भरता येत असल्याची माहिती तहसीलदार श्री. लव्हे यांनी दिली.

या मोहिमेत कोळंब मंडळ अधिकारी मिनल चव्हाण, सर्व ग्राम महसूल अधिकारी, सरपंच तसेच पोलिस पाटील यांनी सक्रिय सहकार्य केले.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे