konkandhara.com

फुंणगूस येथून हापूस आंबा हंगामाची दमदार सुरुवात

फुंणगूस येथून हापूस आंबा हंगामाची दमदार सुरुवात

प्रतिनिधी : कोकणधारा

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील खाडीपट्ट्यातील फुंणगूस गावातून दरवर्षीप्रमाणे यंदाही हापूस आंबा हंगामाची दमदार सुरुवात झाली आहे. फुंणगूस येथील प्रसिद्ध आंबा उत्पादक रमेश लांजेकर यांनी यंदाच्या हंगामातील पहिली आंबा पेटी पुणे बाजारपेठेकडे रवाना करून मानाचा मान पुन्हा एकदा पटकावला आहे.

“लांजेकर बंधू मॅंगोज” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या लांजेकर बंधूंनी वर्षभर घेतलेल्या मेहनतीचे गोड फळ अखेर १० मार्च २०२६ रोजी मिळाले. त्यांच्या बागेतील दर्जेदार हापूस आंब्याची पहिली पेटी पुणे मार्केटकडे पाठवण्यात आली असून त्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संगमेश्वर खाडीपट्ट्यातील आंबा बागायतदारांसाठी हा क्षण विशेष मानला जात असून लांजेकर बंधूंच्या या पुढाकारामुळे यंदाच्या आंबा हंगामाची उत्साहपूर्ण सुरुवात झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

आंब्याबाबत अधिक माहितीसाठी ९७६७६४९०६६ (कॉलिंग) किंवा ९२०९९०८९४५ (व्हॉट्सअॅप) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Releated Posts

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार

रत्नागिरी : दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. यानिमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध…

ByByEditorial मई 15, 2026

सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी

प्रलंबित वॉटर पाईपलाईन कामावरून आमदार दिपक केसरकर, नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोंसले यांनी कंत्राटदारांना धरले धारेवर सावंतवाडी : भूषण…

ByByEditorial मई 15, 2026

भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरातून २१ हजारांहून अधिक नागरिकांना दिलासा सिंधुदुर्ग : भूषण सावंत : अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना…

ByByEditorial मई 15, 2026

रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे

तालुकास्तरीय कृषी मेळाव्याला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद कोलाड (शरद जाधव ) जिल्ह्यातील काही तालुक्यांत कृषी मिळावे आयोजीत झाले, त्यातील…

ByByEditorial मई 15, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे
वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू.
रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
‘माझ्या माहेरच्या साडी’च्या मानकरी ठरल्या कमल नाईक
लोकशाहीचा गळा घोटणारे राजभवन | संघराज्य रचनेसमोरील मोठे आव्हान