konkandhara.com

  • Home
  • पुस्तक
  • इंग्रजी लोणच्यासारखं, पण मातृभाषेला मान द्या” – गुलाबराव पाटील यांचा शिक्षकांना सल्लाआदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात मंत्री पाटील यांची प्रतिक्रिया; मराठी शाळांची पटसंख्या वाढवण्याचे आवाहन
Image

इंग्रजी लोणच्यासारखं, पण मातृभाषेला मान द्या” – गुलाबराव पाटील यांचा शिक्षकांना सल्लाआदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात मंत्री पाटील यांची प्रतिक्रिया; मराठी शाळांची पटसंख्या वाढवण्याचे आवाहन

जळगाव – “जेवणात जसं लोणचं लागतं, तसंच थोडं इंग्रजी यायला हरकत नाही. पण आपल्या मातृभाषेचा आदर राखलाच पाहिजे,” असा अनोखा सल्ला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी शिक्षकांना दिला. शिक्षक दिनानिमित्त जळगाव येथे आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.

कार्यक्रमात त्यांनी पुढाऱ्यांची मुलं विरुद्ध शिक्षकांची मुलं यांच्यातील तुलना मांडली. “आदर्श शिक्षकांची मुलं मोठ्या पदावर असतात. पण पुढाऱ्यांची मुलं फार मोठ्या ठिकाणी नसतात. राजकारण्यांकडे प्रॉपर्टी असते, पण शिक्षकांची खरी प्रॉपर्टी म्हणजे त्यांची घडलेली मुलं,” असे ते म्हणाले.

“इंग्रजी मीडियमची मुलं फोडून मराठी शाळेत घ्या”

गुलाबराव पाटील यांनी शाळांच्या पटसंख्येवर भाष्य करताना म्हटलं –

“जशी भाजप कोणालाही पक्षात घेत असते, तशीच तुम्ही इंग्रजी मीडियमची मुलं फोडून जिल्हा परिषद शाळेत घ्या. मराठी शाळांची पटसंख्या वाढली तरच आदर्श शिक्षक घडतील.”

त्यांनी हेही सांगितले की पटसंख्या कमी झाल्यामुळे शिक्षक भरती रखडली आहे. मराठी शाळांची स्थिती आता पूर्वीपेक्षा सुधारली आहे, मात्र अजूनही पटसंख्या टिकवण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

आदर्श शिक्षक आणि कुटुंबाचा वाटा

सोहळ्यात पाटील म्हणाले –

“आदर्श शिक्षक होण्यात पत्नींचाही मोठा वाटा आहे. कारण त्यांच्या आधारामुळेच गुरुजी आपलं कर्तव्य पार पाडू शकतात. आदर्श शिक्षकांवर कोणी टीका करत नाही. ते समाजात विद्यार्थी घडवण्याचं महान काम करतात.”

शिक्षकांसाठी ड्रेसकोडची मागणी

शाळांमधील शिक्षकांच्या शिस्तीवर बोलताना पाटील म्हणाले –

“पूर्वीचे शिक्षक नेहमी ड्रेसकोडमध्ये असायचे. आता तसं नाही. पण शाळेत तरी शिक्षकांचा ड्रेसकोड असायलाच हवा. कारण गुरु हा देवाच्या स्थानी असतो.”

Releated Posts

सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे; सरकारकडून सकारात्मक आश्वासनानंतर निर्णय

मुंबई : सुधारीत निवृत्ती वेतन योजनेसह विविध १८ मागण्यांसाठी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला…

ByByEditorial अप्रैल 26, 2026

वाढत्या डिझेल दरवाढीने मच्छिमार आर्थिक अडचणीत;केंद्राकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे,

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई :दि .23 :महाराष्ट्रातील मच्छीमारांना वाढत्या डिझेल दरांमुळे मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असून,…

ByByEditorial मार्च 23, 2026

लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात ११ ग्रामपंचायतींचे ठराव; आंदोलनाला अधिक धार

प्रतिनिधी : कोकणधारा खेड : लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील वादग्रस्त लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल लिमिटेड कंपनीच्या अडचणींमध्ये वाढ झाली…

ByByEditorial मार्च 20, 2026

१७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये २७ ते २० मार्चदरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली…

ByByEditorial मार्च 13, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे
वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू.
रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
‘माझ्या माहेरच्या साडी’च्या मानकरी ठरल्या कमल नाईक
लोकशाहीचा गळा घोटणारे राजभवन | संघराज्य रचनेसमोरील मोठे आव्हान