konkandhara.com

गुहागरमध्ये बेकायदेशीर मच्छीविक्रीवर कारवाईची मागणी | ग्रामपंचायतीचे पोलिसांना पत्र

बेकायदेशीर मच्छीविक्रीविरोधात कारवाईची मागणी

गुहागर (प्रतिनिधी) : गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतसमोर मच्छी विक्रीसाठी सुसज्ज मार्केट उभारण्यात आले असतानाही काही महिला विक्रेत्या नियम झुगारून शृंगारतळी मुख्य बाजारपेठेत रस्त्यावर बसून बेकायदेशीरपणे मच्छीविक्री करत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

ग्रामपंचायतीने वेळोवेळी सूचना देऊन तसेच कारवाई करूनही संबंधित महिला वर्दळीच्या ठिकाणी उघड्यावरच मच्छी विक्री करत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत ग्रामपंचायतीने गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना पत्र दिले आहे.

पत्रात नमूद केल्याप्रमाणे, या बेकायदेशीर मच्छीविक्रेत्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून पादचारी व व्यापाऱ्यांना अडथळा निर्माण होत आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी संबंधित महिलांना अधिकृत मच्छीमार्केटमध्ये बसण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र त्यांनी त्या मान्य करण्यास नकार देत सार्वजनिक ठिकाणीच विक्री सुरू ठेवली आहे.

याशिवाय, मासे साफ करताना टाकलेली खवले आणि सांडलेल्या घाण पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या वारंवार सूचनांकडे दुर्लक्ष होत असल्याने संबंधित महिलांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायतीने केली आहे.

Releated Posts

परंपरेचा वारसा, स्त्रीकर्तृत्वाचा गौरव!

भोरगाव लेवा पाटीदार पंचायतच्या वतीने ‘नवदुर्गा सन्मान पुरस्कार २०२६’ सोहळा उत्साहात; विविध क्षेत्रांतील नऊ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान अंबरनाथ…

ByByEditorial नवम्बर 23, 2026

देवगडच्या समुद्रात मध्यरात्री थरार! तासभर पाठलाग करून कर्नाटकची हायस्पीड ट्रॉलर जप्त

सिंधुदुर्ग : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदा मासेमारी करणाऱ्या परराज्यातील नौकांविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागाने पुन्हा एकदा धडक कारवाई केली आहे.…

ByByEditorial नवम्बर 23, 2026

रॅपिडोविरोधात रिक्षाचालकांचा राज्यव्यापी बंद!

मुंबई-पुण्यात संमिश्र प्रतिसाद; कोल्हापुरात हजारो रिक्षाचालक सहभागी, ठाण्यात सेवा सुरळीत मुंबई : अॅपआधारित रॅपिडो बाइक टॅक्सी सेवेमुळे पारंपरिक…

ByBycare.eviano@gmail.com नवम्बर 23, 2026

अलिबागमध्ये नार्वेकर बंधूंची जमीन खरेदी; आदिवासींची घरे पाडल्याचा आरोप!

संजय राऊतांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; म्हात्रोळीतील कातकरी कुटुंबांच्या विस्थापनाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग…

ByBycare.eviano@gmail.com नवम्बर 23, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

परंपरेचा वारसा, स्त्रीकर्तृत्वाचा गौरव!
देवगडच्या समुद्रात मध्यरात्री थरार! तासभर पाठलाग करून कर्नाटकची हायस्पीड ट्रॉलर जप्त
रॅपिडोविरोधात रिक्षाचालकांचा राज्यव्यापी बंद!
अलिबागमध्ये नार्वेकर बंधूंची जमीन खरेदी; आदिवासींची घरे पाडल्याचा आरोप!
अखिलेश यादव यांचे फेसबुक पेज दीड तास गायब!
शिरसाटांच्या गौप्यस्फोटावर शिंदेंची सावध प्रतिक्रिया!
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक बदल होणार?
रोहित पवारांच्या आंदोलनाला पक्षाचा पाठिंबा!
एनव्हिडियाच्या नेतृत्वात पुन्हा जेनसन हुआंग!