konkandhara.com

गुहागर-चिपळूण मार्गावर भीषण अपघात; तरुणाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

दुचाकी – व्हॅन अपघातात तरुणाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

गुहागर : गुहागर-चिपळूण मार्गावरील चिखली येथील स्वामी समर्थ मठाजवळ टाटा मॅजिक मायक्रोव्हॅन आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात होऊन एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. १६) दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. ओम संतोष शितप (वय २०, रा. पवारसाखरी) आणि प्रतीक रमेश भुवड (वय २५) हे दोघे मित्र दुचाकीवरून (एमएच ०८ बीएच ८८३०) चिपळूणकडे जात होते. त्याचवेळी मळण येथील टाटा मॅजिक मायक्रोव्हॅन (एमएच १२ एचव्ही ५१९५) स्वामी समर्थ मठाजवळ प्रवाशाला सोडून श्रृंगारतळीच्या दिशेने परत जात असताना दोन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक झाली.

या अपघातात ओम शितप याचा जागीच मृत्यू झाला, तर प्रतीक भुवड गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक तसेच गुहागरचे पोलिस निरीक्षक सचिन सावंत, पोलिस उपनिरीक्षक भोपाळे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ वाहतूक सुरळीत केली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Releated Posts

व्हॉइस ऑफ मीडिया सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी यश माधव यांची निवड

​दोडामार्ग : भूषण सावंत : ९८ देशांत कार्यरत असलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या जागतिक पत्रकार संघटनेची सिंधुदुर्ग जिल्हा…

ByByEditorial अप्रैल 18, 2026

खानोलीत रंगणार पौराणिक नाट्य महोत्सव

दिनांक २१ एप्रिल ते २७ एप्रिल पर्यंत संपन्न होणार वेंगुर्ला : प्रतिनिधीVengurla तालुक्यातील खानोली गावच्या वतीने श्री देव…

ByByEditorial अप्रैल 18, 2026

देशी दारू व बिअरची वाहतूक; २ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त

दापोली: विनापरवाना देशी दारू व बिअरची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाविरोधात दापोली पोलिसांनी शुक्रवारी दुपारी गुन्हा दाखल केला. या कारवाईत…

ByByEditorial अप्रैल 18, 2026

राजापूर पं. स. च्या सभेत बॉक्साईट उत्खननाला विरोध

राजापूर : तालुक्यातील सागवे, नाणार आणि कुंभवडे परिसरात प्रस्तावित बॉक्साईट उत्खननाला तीव्र विरोध दर्शवत पर्यावरणपूरक प्रकल्पांना प्राधान्य द्यावे,…

ByByEditorial अप्रैल 18, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

महिला आरक्षणाचा बनाव उघडा, 'डीलिमिटेशन' हा देश तोडण्याचा कट; खासदार संजय सिंह यांचा घणाघात!
महिलांच्या नावाखाली 'सीटांचा' जुगाड करणाऱ्यांचा मुखवटा फाटला!
व्हॉइस ऑफ मीडिया सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी यश माधव यांची निवड
khanoli-dashavatari-natya-mahotsav-vengurla
दापोलीत विनापरवाना दारू वाहतूक उघड; २.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
राजापूर पं. स. च्या सभेत बॉक्साईट उत्खननाला विरोध
चिपळूण बाजारपेठेत अतिक्रमण हटवण्याची जोरदार कारवाई; नगरपरिषद सतर्क
टँकरमधून गॅस चोरी प्रकरणातील आरोपी ४ वर्षांनी अटकेत; पोलिसांची कारवाई
रत्नदुर्ग किल्ल्यावर मद्यपान करणाऱ्या चौघांना पोलिसांकडून ताब्यात