konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • गोवा दारुच्या तस्करी विरोधात परवानाधारकांचे लाक्षणिक उपोषण :
Image

गोवा दारुच्या तस्करी विरोधात परवानाधारकांचे लाक्षणिक उपोषण :

१ मे महाराष्ट्र दिनी रत्नागिरी जिल्ह्यातील परमिट रूम परवानाधारक आणि सरकारमान्य देशी मद्य विक्री परवानाधारक यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जयस्तंभ येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
५४ वर्षे व्यवसाय करून शासनाला महसूल मिळवून देत असताना गेली ५ वर्षे गोवा बनावटीच्या बोगस दारू तस्करी मुळे शासकीय महसूल पूर्णपणे बुडाला आहे. लायसन्स फी प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे सरकारी परवानाधारक अडचणीत सापडले आहेत. पूर्वी महाराष्ट्र सरकारचा रोड टॅक्स गोव्याच्या रोड टॅक्स पेक्षा कितीतरी पट अधिक असल्यामुळे महाराष्ट्रातील लोकं गोव्यातून गाड्या खरेदी करत होते हे महाराष्ट्र शासनाच्या लक्षात आल्यावर महाराष्ट्र शासनाने गोव्याच्या धर्तीवर रोड टॅक्स केल्यावर गोव्यातून गाडी खरेदी बंद झाली आणि महाराष्ट्रातून गाड्या खरेदी वाढली. पर्यायाने महाराष्ट्राचा महसूल वाढला. तोच निकष अबकारी करावर लावल्यास महाराष्ट्रlचा राज्य उत्पादन शुल्क कर पाच पटीने वाढेल. ४० हजार कोटी मिळणारा उत्पादन शुल्क व व्हॅट महसूल दिड लाख कोटी वर जाईल. शासनाच्या विविध रखडलेल्या लाडकी बहीण सारख्या योजना, रखडलेली पेन्शन, ठेकेदारांची रखडलेली बिले गोवा दारू बंदी मुळे सुरळीत होऊ शकतात.
महाराष्ट्रात २१०/- रु मध्ये मिळणारी व्हिस्कीची क्वार्टर गोव्यात ३०/- रु मध्ये मिळते. अनेक शाळांमधील विद्यार्थी खाऊला दिलेले पैसे एकत्र करून गोव्याची दारू पीत आहेत आणि आपले जीवन अंधःकारमय करत आहे. शाळांच्या जवळ मिळणाऱ्या गोव्याच्या दारू विरोधात मुख्याध्यापक तक्रार देत आहेत. तरीही प्रशासन कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीत.


परवानाधारकांनी आपल्या मागण्या मांडताना अवैध गोवा दारू विक्रीवर पोलीस खाते, एक्सlईज, पोलीस पाटील, महिला बचत गट, होमगार्ड यांची संयुक्त कारवाई करून ज्या जागेत गोवा दारूचा साठा मिळेल त्या जागेच्या मालकावर गुन्हा दाखल करावा. ज्या अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात अवैध गोवा दारू विक्री आढलेल त्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात यावं. अवैध गोवा दारू विक्रीत्यांचे आयकर विवरण पत्रावरील माहिती वरुन उत्पन्न बाह्य संप्पतीची चौकशी करून मलमत्ता जप्त करण्यात यावी तसेच अवैध गोवा दारू विक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक, रा उ शु अधीक्षक, जिल्हापरिषद सीईओ आणि सरकारमान्य मद्य विक्री संघटना प्रतिनिधी यांची कमिटी स्थापन करून दर महिना बैठक आयोजीत करून आढावा घेण्यात यावा. राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन गोवा अवैध दारुवर कडक कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले यावेळी उपोषणकर्त्यांमध्ये जयेंद्र कोठारकर, अनिश भाटकर राजापूर संतोष जंगम चिपळूण, स्वप्नील आंबोलकर साटवली, राजीव कीर रत्नागिरी, सुहास भोसले चिपळूण, विजय कदम चिपळूण, समीर तिवरेकर रत्नागिरी, सुदीप चव्हाण गुहागर, सचिन वाघधरे लांजा, प्रशांत पवार राजापूर, प्रशांत रमेश शिंदे राजापूर, विनय गुरव राजापूर, सचिन आखाडे जैतापूर, सतीश घाडी जैतापूर, सनी करंगुटकर जैतापूर, रविंद्र गुरव आडीवरे, संजय ओगले राजापूर, संजय काणेकर राजापूर आदी उपस्थित होते

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे