konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • ईद निमित्त चिपळूणमध्ये सौहार्दाचा संदेश; मुस्लिम बांधवांना शुभेच्छा
Image

ईद निमित्त चिपळूणमध्ये सौहार्दाचा संदेश; मुस्लिम बांधवांना शुभेच्छा

प्रतिनिधी : कोकणधारा

चिपळूण : सर्वधर्म समभाव आणि सामाजिक सलोखा यांचा सुंदर प्रत्यय देणारा एकात्मतेचा संदेश ईद-उल-फितरच्या निमित्ताने चिपळूणमध्ये अनुभवायला मिळाला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मापारी मोहल्ला मस्जिद (प्रभाग क्र. ४) येथे ईदच्या नमाजानंतर मुस्लिम बांधवांना पुष्प देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

या उपक्रमातून सणांच्या माध्यमातून समाजात बंधुभाव, प्रेम, एकात्मता आणि सौहार्द वाढवण्याचा संदेश देण्यात आला. “ईदचा सण केवळ धार्मिक उत्सव नसून समाजाला एकत्र आणणारा आणि मानवतेचा संदेश देणारा आहे,” अशा भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.
या प्रसंगी नगरसेवक अजय भालेकर, वैशाली कदम, संजय गोताड, युवसेना चिपळूण शहर अधिकारी पार्थ जागुष्टे यांच्यासह प्रसाद म्हापुस्कर, लावेश म्हापुस्कर, सुरेश पाथरे, विलास चिपळूणकर, संदिप मनोरकर, प्रकाश साडविलकर, परिमल साडविलकर, गणेश गांधी, सचिन लकेश्री आणि पंकज सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

अशा उपक्रमांमुळे सामाजिक सलोखा आणि परस्पर आदराची परंपरा अधिक दृढ होत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे