konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • दुबईत अडकलेले संगमेश्वर तालुक्यातील १३ जण मायदेशी परतले; जेष्ठ पत्रकार सुरेश सप्रे यांचाही समावेश
दुबईत अडकलेले संगमेश्वर तालुक्यातील १३ जण मायदेशी परतले; जेष्ठ पत्रकार सुरेश सप्रे यांचाही समावेश

दुबईत अडकलेले संगमेश्वर तालुक्यातील १३ जण मायदेशी परतले; जेष्ठ पत्रकार सुरेश सप्रे यांचाही समावेश

विशेष प्रतिनिधी, कोकणधारा

देवरुख : इस्राईल तसेच अमेरिका–इराणदरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे हवाई वाहतूक बंद झाल्याने दुबईमध्ये अडकलेले संगमेश्वर तालुक्यातील नागरिक अखेर सुखरूप मायदेशी परतले आहेत. यात देवरुख येथील जेष्ठ पत्रकार सुरेश सप्रे यांच्यासह एकूण १३ जणांचा समावेश आहे.

हे सर्व जण गुरुवारी (ता. ५) सकाळी हैद्राबाद व बेंगळुरू विमानतळावर पोहोचले. त्यानंतर विविध वाहनांनी ते आपल्या गावी परतले.
मायदेशी परतलेल्या नागरिकांमध्ये सुरेश सप्रे, ज्योती सप्रे, नगरसेविका श्रद्धा इंदुलकर, जितेंद्र निमकर, कृतुजा निमकर, अभिषेक निमकर, मानसी निमकर, साखरप्यातील संदेश (बापू) शेट्ये, सोनम शेट्ये यांच्यासह अन्य चार जणांचा समावेश आहे. तसेच चिपळूण येथील सनी व रुची जागुष्टे हेही चिपळूणला सुखरूप परतले आहेत.

दुबईत विमानसेवा बंद झाल्याने या सर्वांना काही दिवस हॉटेलमध्ये थांबावे लागले होते. नंतर दुबई प्रशासन आणि केंद्र सरकारने विमानसेवेची व्यवस्था केल्यानंतर बुधवारी (ता. ४) एक जण मुंबईत, तर सहा जण हैद्राबाद आणि सहा जण बेंगळुरू येथे विमानाने दाखल झाले.

यानंतर गुरुवारी ते सर्वजण आपल्या गावी परतले असून त्यांच्या आगमनाने कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे