konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • धाडसी पुढाकार ! माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांचे सरसावले पाऊल ; रस्त्यांवर कोसळलेले झाड हटवून वाहतूक सुरळीत
Image

धाडसी पुढाकार ! माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांचे सरसावले पाऊल ; रस्त्यांवर कोसळलेले झाड हटवून वाहतूक सुरळीत

दोडामार्ग / भूषण सावंत : दोडामार्ग शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात अचानक रस्त्यावर कोसळलेल्या फणसाच्या झाडामुळे नागरिक आणि प्रवाशांची मोठी गैरसोय निर्माण झाली होती. अंधारातच वाहतुकीचा पूर्णपणे खोळंबा झाला आणि अपघाताचा धोका निर्माण झाला होता. मात्र, या गंभीर परिस्थितीत माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे यांनी तात्काळ पुढाकार घेत परिस्थिती हाताळत नागरिकांना मोठा दिलासा दिला.

हातात कुऱ्हाड घेत संतोष नानचे स्वतः घटनास्थळी दाखल झाले आणि स्थानिक तरुणांच्या मदतीने झाड कापण्याचे काम हाती घेतले. कोणतीही यंत्रणा येण्याची वाट न पाहता त्यांनी तातडीने कृती करत रस्त्यावर पडलेले झाड हटवले आणि काही वेळातच रस्ता पूर्णपणे मोकळा केला. यामुळे अडकलेल्या वाहनचालकांना आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

या कामात ओंकार पेडणेकर, शिवम पांचाळ, लक्ष्मण परब, महेश रवार, फोंडू हडीकर आणि चिन्मय प्रसादी आदी तरुणांनी सक्रिय सहभाग घेत मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या या तत्परतेमुळे संभाव्य मोठा अपघात टळला.

स्थानिक नागरिकांकडून संतोष नानचे आणि सहकार्य करणाऱ्या तरुणांचे कौतुक होत असून, प्रशासनानेही अशा प्रसंगी तात्काळ प्रतिसाद देण्याची गरज असल्याची मागणी जोर धरू लागली आहे. ही घटना म्हणजे जनतेसाठी पुढे सरसावणाऱ्या नेतृत्वाचा आदर्श ठरली आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे