konkandhara.com

Image

दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकले !

आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची जोरदार रणनीती बैठक; “पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार”

दोडामार्ग | भूषण सावंत :
दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून, शिवसेनेने आता थेट रणशिंग फुंकले आहे. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवण्याचा ठाम निर्धार करण्यात आला.

या बैठकीत आमदार राणे यांनी पदाधिकाऱ्यांना थेट मार्गदर्शन करत निवडणुकीसाठी आक्रमक रणनीती आखण्याचे आदेश दिले. प्रत्येक प्रभागातील कामांचे काटेकोर नियोजन, जनसंपर्क वाढवणे आणि तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचणे यावर विशेष भर देण्यात आला. “आता कोणतीही ढिलाई चालणार नाही, विजय हाच एकमेव लक्ष्य आहे,” असा स्पष्ट संदेश यावेळी देण्यात आला.

तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच आणि शिवसैनिकांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत आमदार निलेश राणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आगामी निवडणुकीसाठी संघटनात्मक बळकटी, कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग आणि बूथ स्तरावर मजबूत यंत्रणा उभी करण्यावर सखोल चर्चा झाली.

या प्रसंगी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. संघटना विस्तार, नव्या कार्यकर्त्यांची जोडणी आणि गावागावांत पक्षाची पकड अधिक मजबूत करण्यासाठी ठोस उपाययोजना आखण्यात आल्या.

बैठकीत जिल्हा प्रमुख संजू परब, विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, शैलेश दळवी, गोपाळ गवस, जिल्हा परिषद सदस्या सौ. तळवणेकर, तालुका प्रमुख तथा उपसभापती गणेशप्रसाद गवस, पंचायत समिती सदस्या सौ. सायली निबाळकर, स्नेहा गवस, सरपंच संघटना अध्यक्ष अनिल शेटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

👉 या निर्णायक बैठकीनंतर दोडामार्ग तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना जोरदार ताकद दाखवणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे