konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • पत्रकार दीपक भागवत मारहाण प्रकरण’चिपळूण नगरी’च्या १० जणांविरुद्ध दोषारोपपत्र,
Image

पत्रकार दीपक भागवत मारहाण प्रकरण’चिपळूण नगरी’च्या १० जणांविरुद्ध दोषारोपपत्र,

१८ दिवसांत तपास पूर्ण; न्यायालयात दोषारोपपत्र दाखल
यादव पती-पत्नीचाही जबाब; पत्रकारांचे उपोषण तात्पुरते स्थगित

चिपळूण : शहरात खळबळ उडवून देणाऱ्या पत्रकार दीपक भागवत मारहाण प्रकरणात पोलिसांनी जलद गतीने तपास पूर्ण करत महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. अवघ्या १८ ते १९ दिवसांत तपास पूर्ण करून सोमवारी (दि. १३ एप्रिल) चिपळूण येथील न्यायदंडाधिकारी वर्ग-१ न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल करण्यात आले. या प्रकरणात चिपळूण नागरी पतसंस्थेच्या १० कर्मचाऱ्यांना आरोपी करण्यात आले आहे.

या घटनेनंतर पत्रकार संघटनांनी तीव्र भूमिका घेत निषेध आंदोलनाचा इशारा दिला होता. विशेषतः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी उपोषणाचा इशाराही देण्यात आला होता. मात्र पोलिसांनी भारतीय न्याय दंड संहिता २०२३ अंतर्गत कलम ४०० लागू करून पुढील कार्यवाही सुरू केल्याने पत्रकारांनी जाहीर केलेले उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे.

ओळख परेड, पुरावे आणि जबाब नोंदणी
तपासादरम्यान फिर्यादी दीपक भागवत यांच्या उपस्थितीत संशयित आरोपींची दोनवेळा ओळख परेड घेण्यात आली. तसेच भागवत यांच्या पुरवणी जबाबानुसार प्रशांत यादव आणि पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांचेही जबाब नोंदवण्यात आले.

प्रशांत यादव यांचा कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तपासण्यात आला असता, घटनेच्या वेळी ते संगमेश्वर येथे असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांच्या प्रत्यक्ष सहभागाचे कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीत. पत्रकारांच्या मागणीनुसार स्वप्ना यादव यांचाही सीडीआर तपासण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी तथा तपास अधिकारी प्रकाश बेले यांनी दिली.

सीसीटीव्ही फुटेज ठरले महत्त्वाचे
मारहाणीच्या घटनेच्या ठिकाणचे शासकीय सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांनी हस्तगत केले असून ते चार्जशीटसोबत न्यायालयात सादर करण्यात आले आहे. या फुटेजमुळे घटनाक्रम स्पष्ट करण्यात पोलिसांना मदत झाली असल्याचे सांगण्यात आले. चिपळूण नागरी पतसंस्थेतील एका अधिकाऱ्याला बोलावून त्याच्याकडून व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या दहाजणांची ओळख पटवण्यात आल, असेही त्यांनी सांगितले

दहा कर्मचाऱ्यांवर दोषारोपपत्र
या प्रकरणात संदीप गणू घुले (मालघर, वाजेवाडी), मंगेश मनोहर महाडिक (मुंडेतर्फे चिपळूण, शिर्केवाडी), सचिन रमेश डेरवणकर (बीजघर, सुतारवाडी, ता. खेड), सौरभ नरेंद्र सुर्वे (बिरमणी वरचीवाडी, ता. खेड), रोहित सुरेश खांबे (मांडकी खांबेवाडी), संकेत दत्ताराम कदम (पेढांबे भराडेवाडी), अभिषेक चंद्रकांत मोहिते (मार्कंडी, चिपळूण), चैतन्य रामचंद्र कदम (खेर्डी, शिवाजीनगर), विनोद लक्ष्मण खेतले (मुंडे, खोतवाडी), प्रशांत आत्माराम पवार (पवारआळी चिपळूण) अशा एकूण १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गंभीर कलमांचा समावेश
या प्रकरणात भारतीय न्याय दंड संहिता २०२३ अंतर्गत कलम १८९(२), १९०, १९१(२), ३०३(२), ११५(२), ३५२, ३५१(२)(३) यांसह विविध कलमांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय ‘महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था अधिनियम २०१७’ अंतर्गतही कलमे लावण्यात आली आहेत, ज्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

पत्रकार व नागरिकांमध्ये समाधानाची भावना
चार्जशीट दाखल झाल्याची माहिती मिळताच स्थानिक पत्रकारांनी तपास अधिकारी प्रकाश बेले यांची भेट घेत तपासाबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. अल्पावधीत तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल केल्यामुळे पत्रकार व नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे.

आता हे प्रकरण पुढील न्यायप्रक्रियेसाठी न्यायालयात गेल्याने सर्वांचे लक्ष सुनावणीकडे लागले असून, आरोपींना योग्य शिक्षा मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे